Shivam Dube Sakal
Cricket

Team India: भारतीय संघात मोठा बदल, 'हा' खेळाडू जखमी झाल्यानं शिवम दुबेची लागली वर्णी

Shivam Dube: आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात शिवम दुबेला बदली खेळाडू म्हणून संधी मिळाली आहे.

Pranali Kodre

India Tour of Zimbabwe: बीसीसीआयने झिम्बाब्वे विरुद्धच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यात 5 सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. मात्र, हा दौरा सुरू होण्यापूर्वीच भारताच्या निवड समितीला संघात बदल करावा लागला आहे.

भारतीय संघात निवडलेला युवा अष्टपैलू खेळाडू नितीश रेड्डी दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागेवर बीसीसीआयने शिवम दुबेला संधी दिली आहे. 21 वर्षीय नितीशला पहिल्यांदाच भारताच्या संघात संधी देण्यात आली होती. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पणाचीही संधी होती.

मात्र आता दुखापतीमुळे त्याला ही संधी गमवावी लागणार आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या दुखापतीवर मेडिकल टीम लक्ष ठेवून असेल.

दरम्यान, निवड समितीने या दौऱ्यासाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली असून युवा खेळाडूंना संधी दिली आहे. या संघाचे कर्णधारपदही रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत शुभमन गिलकडे आहे.

तसेच सध्या टी२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा भाग असलेल्या संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल यांच्याबरोबरच आता शिवम दुबेही झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. टी२० वर्ल्ड कपमध्ये दुबेने काही महत्त्वाच्या खेळीही भारतासाठी खेळल्या आहेत.

असा असेल दौरा

भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यात जुलै महिन्यातील दिनांक 6, 7, 10, 13 आणि 14 या दिवशी टी20 सामने होणार आहेत. हे सर्व सामने हरारेला होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता चालू होतील.

  • असा आहे भारतीय संघ - शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार , तुषार देशपांडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Security Breach: एक्सप्रेस ट्रेनमध्ये धक्कादायक प्रसंग! इंजिनमध्ये बोगस लोको पायलट रंगेहात पकडला, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Rohit Pawar: अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा; तर सरकाला श्वास घेणेही घेणे अवघड होईल, आमदार रोहित पवार....

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT