Renuka Singh  esakal
Cricket

IND vs PAK T20WC : what a ball…! पाकिस्तान संघाला पहिल्याच षटकात धक्का, Renuka Singh ने उडवला त्रिफळा, Video

India W vs Pakistan W T20 World Cup : भारतीय संघाला महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी उर्वरित तिन्ही लढती जिंकणे गरजेच्या आहेत.

Swadesh Ghanekar

India W vs Pakistan W T20 World Cup Marathi Update: भारतीय महिला संघासाठी आजचा सामना करो वा मरो असाच आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना प्रत्येक सामना जिंकणं गरजेचे आहे. आज भारताचा मुकाबला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात विजय मिळवून अ गटात आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतासमोरील आव्हान आणखी अवघड झाले आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

हरमनप्रीत कौर म्हणाली, ''आम्हालाही प्रथम फलंदाजी करायची होती. आमच्याकडे चांगली संधी आहे. आमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल आहे, पूजा खेळत नाहीये. या टप्प्यावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे पाहावे लागेल. आम्हाला फक्त सकारात्मक क्रिकेट खेळायचे आहे.'' पाकिस्तानला पहिल्याच षटकात धक्का बसला. रेणुका सिंग ठाकूरने पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अप्रतिम ऑफ कटर टाकून सलामीवीर गुल फिरोझाचा ( ०) त्रिफळा उडवला.

पाकिस्तान – मुनीबा अली, गुल फेरोझा, सिद्रा आमीन, निदा दार, आलिया रियाझ, ओमैमा सोहैल, फातिमा सना, तुबा हसन, नाश्रा संधू, आरुब शाह, सादिया इक्बाल

भारत – स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, जेमीमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, दीप्ती शर्मा, अरुद्धती रेड्डी, एस संजना, श्रेयंका पाटील, आशा सोभना, रेणुका सिंग  

विकेट गेल्यानंतर मुनीबा अली आणि सिद्रा आमीन यांनी दडपण न घेता खेळ केला आणि रेणुकाच्या दुसऱ्या षटकात दोघींनी १२ धावा चोपल्या. त्यामुळे कर्णधार हरमनप्रीत कौरला गोलंदाजीत बदल करावा लागला आणि अरुंद्धती रेड्डी गोलंदाजीला आली. दीप्ती शर्माने तिच्या दुसऱ्या षटकात पाकिस्तानला धक्का दिला. सिद्रा आमीन स्वीप मारण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचीत झाली. ती ८ धावांवर बाद झाल्याने पाकिस्तानची अवस्था २ बाद २५ अशी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Himanta Biswa Sarma: मुख्यमंत्री सरमा यांनी धुबरी जिल्ह्यासाठी दिले ‘शूट अ‍ॅट साइट’चे ऑर्डर!

Hadapsar News : ओंकार जाधव याने वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी माउंट किलीमांजारो शिखर केले सर

Sachin Tendulkar: जो रुट मास्टर-ब्लास्टरचा विश्वविक्रम मोडण्याच्या जवळ; सचिन म्हणतोय, 'तो अजूनही...'

Ganeshotsav: गणपती आगमन-विसर्जनासाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील १२ पूल धोकादायक, महापालिकेचं आवाहन

Latest Maharashtra News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT