Ishan Kishan 
Cricket

Ishan Kishan BCCI : इशान किशनच्या केंद्रीय कराराचं काय होणार..? बीसीसीआय अधिकारी म्हणाले...

Ishan Kishan BCCI Central Contract : इशान किशन मानसिक थकवा आल्यानं क्रिकेटपासून दूर आहे.

अनिरुद्ध संकपाळ

Ishan Kishan BCCI : भारताचा विकेटकिपर इशान किशनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. बीसीसीआयने देखील त्याच्या या निर्णयाला समर्थन दिलं होतं. मात्र बराचकाळ क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी परतणार अशी चर्चा सुरू झाली होती. राहुल द्रविडने देखील त्याला आधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला फिटनेस सिद्ध करावा त्यानंतर निवडीसाठी विचार होईल असे स्पष्ट संकेत दिले होते.

इशान किशन हा मानसिक थकवा आल्याने क्रिकेटपासून दूर होता. मात्र तो दुबईत पार्टी करताना आढळून आल्याने बीसीसीआय त्याच्यावर नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे त्याला थेट संघात न घेता देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगण्यात आलं अशी चर्चा होती.

मात्र इशान किशनने रणजी ट्रॉफी न खेळता सराव करण्याला जास्त महत्व दिलं. चर्चा तर इशान किशनचा केंद्रीय करार देखील बीसीसीआय रद्द करणार असल्याची होती. मात्र यावर आता बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली.

इशान किशन सध्या बीसीसीआयच्या क श्रेणी करारात मोडतो. बीसीसीआय अधिकाऱ्याला इशान किशनच्या रिटेंशनबाबत विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी, इशान किशनच्या केंद्रीय कराराबाबत अजून कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही असं सांगितलं.

आयपीएल 2024 नंतर आयसीसी टी 20 वर्ल्डकपचे आयोजन वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणार आहे. जून महिन्यात टी 20 वर्ल्डकपची सुरूवात होईल. यापूर्वी आयपीएल 2024 चा संपूर्ण हंगाम होणार असून त्याची सुरूवात मार्चमध्ये होईल. भारताच्या करारबद्ध खेळाडूंचा वर्कलोड वाढणार आहे.

जरी आयपीएलमध्ये वर्ल्डकलो वाढणार असला तरी आयपीएलदरम्यान भारतीय खेळाडूंच्या वर्कलोडबाबत कोणत्याही सुचना फ्रेंचायजींना देण्यात आलेल्या नाहीत.

पीटीआयशी बोलताना बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले की, 'त्यांना खूप जास्त पैसे मिळत आहेत. ते फ्रेंचायजीसाठी सामन्याची निवड करू शकत नाही. मात्र फ्रेंजायजींना करारबद्ध खेळाडू आणि टार्गेटेड खेळाडू यांच्या फिटनेसबाबतची माहिती रेग्युलर बेसिसवर एनसीएचे स्पोर्ट्स सायन्स हेड नितीन पाटील यांना देणे बंधनकारक आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT