Ishan Kishan BCCI Annual Contract
Ishan Kishan BCCI Annual Contract esakal
क्रिकेट

Ishan Kishan BCCI : इशान-हार्दिकची गट्टी निवडसमितीला नाही आवडली; बीसीसीआयनं थेट कारवाईच केली

अनिरुद्ध संकपाळ

Ishan Kishan BCCI Annual Contract : बीसीसीआयने नुकतेच वार्षिक करार करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीत विकेटकिपर बॅट्समन इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश करण्यात आला नाही. बीसीसीआयने अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध करत त्यांना वार्षिक करारात समावेश केला नसल्याचं सांगितलं. या दोघांनीही बीसीसीआयचे आदेश धुडकावून मनमानी केल्याचे सांगण्यात आले होते.

मात्र यात अजून एका गोष्टीची भर पडल्याचे इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार निवडसमिती बीसीसीआयला वार्षिक करारात कोणत्या खेळाडूंना घ्यायचं आणि त्यांना कोणत्या श्रेणीत ठेवायचं याचा अहवाल देत असते.

याच निवडसमितीला इशान किशनने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासोबत सराव करणं आवडलं नव्हतं. याचबरोबर अय्यरने देखील मुंबईचे सामने सोडून केकेआरच्या प्री आयपीएल सराव सत्राला हजेरी लावली होती. यानंतर निवडसमितीने आपला अहवाल पाठवला अन् बीसीसीआयने योग्य ती कारवाई केली. (Cricket News In Marathi)

वार्षिक करारातून डच्चू मिळाल्यानंतर आर्थिक नुकसानाव्यतिरिक्त, त्यांना बीसीसीआयच्या अनेक सुविधांपासून देखील मुकावे लागणार आहे. आता अय्यर आणि किशन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) सारख्या BCCI सुविधांचा वापर करू शकणार नाहीत. जर या दोन खेळाडूंच्या राज्य संघटनांनी परवानगी दिली तरच ते NCA ची सुविधा वापरू शकतात.

बीसीसीआयचा वार्षिक करार मिळालेल्या खेळाडूंना विमा संरक्षणही मिळते. जर एखाद्या खेळाडूला राष्ट्रीय संघाकडून खेळत असताना दुखापत झाली अन् तो आयपीएल हंगामाला मुकला तर त्याची आर्थिक नुकसान भरपाई बीसीसीआय देत असते. आता अय्यर आणि इशान किशन या सुविधेला मुकणार आहेत.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT