Joe Root  esakal
Cricket

Joe Root Test : रूटनं भारताविरूद्ध केला मोठा विक्रम, रोहितशीही केली बरोबरी

Joe Root India Vs England 4th Test : जो रूटने अखेर चौथ्या कसोटीत शतकी खेळी केली. संघ अडचणीत असताना रूटची बॅट तळपली.

अनिरुद्ध संकपाळ

Joe Root Test Cricket Record : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने 7 बाद 302 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून जो रूटने नाबाद 106 धावांची शतकी खेळी केली. संपूर्ण मालिकेत धावांचा दुष्काळ भोगणाऱ्या जो रूटला अखेर सूर गवसला. त्याने इंग्लंडची अवस्था 5 बाद 112 धावा अशी झाली असताना डाव सावरत शतकी खेळी केली. या खेळीमुळे इंग्लंडचा डाव सावरला गेलाच त्याचबरोबर जो रूटने अनेक विक्रमांना देखील गवसणी घातली.

भारताविरूद्ध सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज

जो रूट हा भारताविरूद्ध सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज ठरला आहे. त्याने भारताविरूद्ध 10 वे शतक ठोकले. यापूर्वी हे रेकॉर्ड स्टीव्ह स्मिथच्या नावावर होते. त्याने भारताविरूद्ध 9 शतके ठोकली होती.

19,000 धावा पूर्ण

चौथ्या कसोटीत जो रूटने ज्यावेळी 92 धावा केल्या त्यावेळी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या 19 हजार धावा पूर्ण केल्या. असा कारनामा करणारा तो इंग्लंडचा पहिला आणि जगातील 14 वा फलंदाज ठरला.

भारताविरूद्ध सर्वात संथ शतक

जो रूटने यापूर्वी भारताविरूद्ध 9 शतके ठोकली होती. मात्र आजचे रूटचे शतक हे भारताविरूद्धचे त्याचे सर्वात संथ शतक ठरलं. त्याने 219 चेंडूत शतक पूर्ण केलं. संपूर्ण कारकिर्दीबाबत बोलायंच झालं तर त्याचं हे तिसरं सर्वात संथ शतक आहे.

रोहित शर्मासोबत केली बरोबरी

जो रूट सध्या खेळत असलेल्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या बरोबरीने आला आहे. रूटचे हे 47 वे आंतरराष्ट्रीय शतक आहे.

रूटचे 254 डावात 31 शतके

जो रूटने 254 कसोटी डावात 31 शतके ठोकली आहेत. आतापर्यंत 14 फलंदाजांनी 31 किंवा त्यापेक्षा जास्त शतक ठोकले आहेत. रूटने 31 शतकात सर्वात संथ गतीने पोहचणारा दुसरा फलंदाजा ठरला आहे. एलिस्टर कूकने 262 डावात 31 शतके ठोकली होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT