joe roo esakal
Cricket

Joe Root बनला इंग्लंडचा 'ग्रेट' फलंदाज; कसोटी क्रिकेटमध्ये नोंदवला भारी विक्रम, राहुल द्रविडशीही बरोबरी

PAK vs ENG : मुल्तान येथील पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या ५५७ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत पाकिस्तानी गोलंदाजांचा धुव्वा उडवला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Joe Root : पाकिस्तानविरूद्ध कसोटी मालिकेत इंग्लिश फलंदाज जो रूटने नवा विक्रम रचला आहे. रूट कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यावेळी रूटने अ‍ॅलिस्टर कूकचा विक्रम मोडला आहे. तर आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये भारतीय दिग्गज खेळाडू राहूल द्रविडच्या विक्रमाची बरोबरी केली व यादीत त्याने चौथे स्थान मिळवले आहे.

मुल्तान येथे सुरू असलेल्या पाकिस्तानविरूद्ध कसोटी मालिकेत रूटने ५ चौकारांसह ७२ धावांची खेळी केली. या ७२ धावांसह रूटने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या १२४७३ धावा पूर्ण केल्या व दोन विक्रम रचले आहेत. याआधी इंग्लंडसाठी १२४७२ धावा करणाऱ्या अ‍ॅलिस्टर कूकला रूटने मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान गाठले आहे. तर रूटने ९९ अर्धशतके पूर्ण करत आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये राहूल द्रविडच्या विक्रमाची बरोबरी केली आणि सर्वाधिक अर्धशतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादित पाचवे स्थान गाठले. या यादीत पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडूलकर (१५९२१), दुसऱ्या स्थानावर रिकी पॉटींग (१३३७८), तिसऱ्या क्रमांकावर जॅक कॅलिस (१३२८९) तर चौथ्या क्रमांकावर राहूल द्रविड(१३२८८) आहे.

पाकिस्तानने सामन्यात प्रथम फलंदाजी करत ५५६ धावसंख्या उभारली. या डावात पाकिस्तानच्या ३ खेळाडूंनी शतकी खेळी केली. सलामीवीर अब्दुला शफीकने १० चौकार व २ षटकारांसह १०२ धावा केल्या. कर्णधार शान मसूदने १७७ चेंडूमध्ये १५५ धावांची कप्तानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १३ चौकार व २ षटकार ठोकले. तर अष्टपैलू खेळाडू सलमान अली अघा याने १०४ धावा पूर्ण करत शतक ठोकले. या तिघांच्या शतकामुळे व साउद शकीलच्या ८२ धावांच्या खेळीमुळे पाकिस्तानने पहिल्या डावात ५५६ धावांचा टप्पा गाठला.

प्रत्युत्तरात इंग्लंड संघ २ विकेट्स गमावत २३३ धावांवर खेळत आहे. सलामीवीर झॅक क्रॉलीने फलंदाजीला सुंदर सुरवात केली. तर कर्णधार ऑली पोप शून्यावर परतला. त्यानंतर झॅक क्रॉली आणि जो रूटने ९९ धावांची मोठी भागीदारी केली. पुढे झॅक क्रॉली ७८ धावांवर परतला. नंतर रूटने बेन डकेटला साथीला घेत इंग्लंडसाठी २३३ धावांचा टप्पा गाठला आहे. जो रूट सध्या ५ चौकारंसह ७३ धावांर खेळत आहे. तर बेन डकेट आक्रमक फलंदाजी करत ६८ चेंडूत ८० धावांवर खेळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant यांचा मोठा निर्णय! कोर्टातील ‘काळे कोट’ संपणार? नावही बदलणार, मोठा बदल लवकरच!

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या तपोवन वृक्ष तोडप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

Beed Forest Department News: वन विभागात टक्केवारीचा खेळ; बोगस बिलांमुळे कोट्यवधींचा गैरव्यवहार?; सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा आरोप

Deepak Dalvi Death : मराठी अस्मितेचा ढाण्या वाघ हरपला! म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन; काही महिन्यांपूर्वीच शरद पवार, जयंत पाटलांनी घेतली होती भेट

LPG Cylinder Shortage : सिलिंडर मिळणे कठीण! इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगड्या वापरा, मोदी सरकारचे जनतेला आवाहन

SCROLL FOR NEXT