Jos Buttler Asked For England’s T20 World Cup-Bound Players Withdrawal From IPL 2024 News Marathi sakal
Cricket

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Kiran Mahanavar

आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांऐवजी वर्ल्डकपच्या तयारीसाठी पाकिस्तानविरुद्धची मालिकेला महत्त्व देण्यामागे इंग्लंड कर्णधार आणि राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जॉस बटलर कारणीभूत असल्याचे आता स्पष्ट होत आहे.

आयीपीएलमधील प्लेऑफचे सामने २१ ते २६ मे या कालावधीत होणार आहेत. याच कालावधीत इंग्लंडची पाकिस्तानविरुद्धची मालिका नियोजित आहे; परंतु बटलरने आयपीएलपेक्षा पाकविरुद्धच्या मालिकेला प्राधान्य देणे गरजेचे असल्याची भूमिका घेतली. ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंडचा सलामीचा सामना ४ जून रोजी बार्बाडोस येथे आयर्लंडविरुद्ध होणार आहे.

यादरम्यान इंग्लंड क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष रॉबर्ट यांनी सांगितले की, "मी त्याला (बटलर) खूप आधी विचारले होते की, तू इंग्लंडचा कर्णधार आहेस आणि विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी पाकविरुद्धची मालिकेकडे तू कसा पाहात आहेस, या प्रश्नावर बटलर लगेचच म्हणाला, मला लगेचच मायदेशी यायचे आहे आणि वर्ल्डकपसाठीच्या या स्पर्धेची तयारी करायची आहे.

या आयपीएलमध्ये राजस्थान संघातून खेळणाऱ्या बटलरने दोन शतके केली आहेत. राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवणार हे निश्चित आहे. त्यांना विजेतेपदाचीही संधी आहे; पण बटलर आता स्वतः प्लेऑफमधून माघार घेत असून आयपीएलमध्ये खेळत असलेल्या इंग्लंड खेळाडूंनाही तो हाच निर्णय घेण्यास भाग पाडत आहे.

बटलरच्या व्यतिरिक्त फिल साल्ट, विल जॅक्स, रीस टोपले, मोईन अली, सॅम करन, जॉनी बेअरस्टॉ आणि लियन लिव्हिंगस्टोन हे इंग्लंडचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. हे खेळाडू माघारी गेल्यास राजस्थान आणि कोलकता संघाला त्याचा फटका बसू शकेल. बंगळूर आणि पंजाब संघ प्लेऑफ गाठू शकणार नसल्यामुळे त्यांना फटका बसण्याचा प्रश्न येणार नाही.

आयपीएल अर्धवट सोडून आपल्याला मायदेशी परतावे लागेल, याची कल्पना इंग्लंडच्या खेळाडूंना होती, आयपीएलसाठी जेव्हा ते भारतात गेले तेव्हाच या खेळाडूंना आम्ही त्यांना कल्पना दिली होती, असे रॉबर्ट की यांनी सांगितले.

दुखापती किंवा अशी महत्त्वाची मालिका याशिवाय आम्ही आमच्या खेळाडूंना आयपीएलमधून मध्येच माघारी बोलावू शकत नाही. आयपीएल संपल्यानंतर पुढच्या मालिकेपर्यंत १५ दिवसांची विश्रांती असणे गरजेचे असते; परंतु आता तसा कालावधीच नाही. परिणामी, आमच्यासमोर पर्याय नसल्याचे की यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT