Kane Williamson wife Sarah Raheem become parents to baby girl Latest Marathi News sakal
Cricket

Kane Williamson : दिग्गज क्रिकेटरच्या घरी हलला पाळणा; 'सारा' झाली आई... गोंडस मुलीला दिला जन्म

Kiran Mahanavar

Kane Williamson wife Sarah Raheem : न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटर केन विल्यमसनच्या घरी तिसऱ्यांदा पाळणा हलला आहे. त्याची पत्नी साराने एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे. विल्यमसनने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली. त्याने पत्नी आणि मुलीसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.

विल्यमसनला दोन मुले आहेत. आता त्याच्या पत्नीने आणखी एका मुलीला जन्म दिला आहे. विल्यमसनच्या आधी नुकताच विराट कोहली दुसऱ्यांदा बाप झाला आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा हिने एका मुलाला जन्म दिला.

विल्यमसनने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो पत्नी आणि मुलीसोबत दिसत आहे. विल्यमसनने कॅप्शनमध्ये लिहिले की, या जगात सुंदर मुलीचे स्वागत आहे. विल्यमसनच्या या फोटोवर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या आहेत.

यसोबत सहकारी खेळाडूंही त्याचे अभिनंदन करत आहेत. वृत्त लिहिपर्यंत विल्यमसनच्या या फोटोला 5 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले होते. तिथे हजारो कमेंट्स बघितल्या गेल्या आहेत.

यामुळेच केन विल्यमसन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेचा भाग नव्हता. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळली, पण त्यानंतर तो रजेवर गेला. मात्र, तो गुरुवार 29 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत केन विल्यमसनने दमदार फलंदाजी करत दोन शतके ठोकली होती.

अशा स्थितीत किवी संघाचा नवा कर्णधार टीम साऊदीला आशा असेल की विल्यमसन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही धावा करेल. ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे, कारण ती ICC जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या नवीन चक्रात खेळली जाणार आहे. न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड संघ हा सामना हरला तर भारतीय संघ पहिल्या स्थानावर पोहोचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT