Rahul Dravid | Gautam Gambhir Sakal
Cricket

IPL 2025: द्रविड नाही, तर 'हा' महान अष्टपैलू घेणार गौतम गंभीरची जागा? KKR संघात होणार बदल

Gautam Gambhir: गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक झालेला असल्याने आता कोलकाता नाईट रायडर्स संघातील त्याची मेंटॉरची जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे ती जागा कोण घेणार, याची चर्चा सुरू आहे.

Pranali Kodre

KKR Mentor: भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले आहे. मात्र, आता यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघातील त्याची जागा रिकामी झाली आहे.

गंभीर आयपीएल २०२४ साठी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मेंटॉर होता. त्याच्याच मार्गदर्शनाखाली कोलकाताने आयपीएल २०२४ विजेतेपदही जिंकले होते.

मात्र, आता कोलकाता संघात मेंटॉरपद रिकामे आहे. दरम्यान, या पदासाठी राहुल द्रविडला विचारणा करण्याच आल्याचे रिपोर्ट्स समोर आले होते.

गंभीरपूर्वी २०२१ च्या अखेरीपासून ते टी२० वर्ल्ड कप २०२४ पर्यंत द्रविडने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले होते. त्याचा कार्यकाळ टी२० वर्ल्ड कपनंतर संपल्यानंतर तो सध्यातरी कोणत्याही पदावर नाही. अशात तो कोलकाता संघाचा मेंटॉर होऊ शकतो अशी जोरदार चर्चा होती.

मात्र, आता टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार कोलकाता संघ दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू जॅक कॅलिसला मेंटॉर म्हणून घेण्याचा विचार करत आहेत. कॅलिस २०१६ ते २०१९ दरम्यान कोलकाता संघाचा मुख्य प्रशिक्षकही होता. तसेच तो २०११ ते २०१४ दरम्यान खेळाडू म्हणूनही आयपीएलमध्ये कोलकाताकडून खेळल आहे.

यादरम्यान, कोलकाताने २०१२ आणि २०१४ साली आयपीएलचे विजेतेपदही जिंकले होते. याशिवाय कॅलिसने यापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणून काम केले आहे.

सहाय्यक प्रशिक्षकांची शोधाशोध

दरम्यान, गंभीरला मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केले असले, तरी अद्याप त्याच्या सहाय्यक प्रशिक्षकांची नियुक्ती होणे बाकी आहे. यासाठी अनेक नावं चर्चेत आली आहे.

अनेक रिपोर्ट्सनुसार फलंदाजी प्रशिक्षकासाठी अभिषेक नायरचे नाव सर्वाधिक चर्चेत आहेत. तसेच गोलंदाजी प्रशिक्षकासाठी झहीर खान, लक्ष्मीपती बालाजी, मॉर्ने मॉर्केल अशी अनेक नावं चर्चेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कारला धडकल्यानंतर पिकअपला लागली आग; तिघांचा होरपळून मृत्यू, एक जण गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांची आज कोल्हापुरात महासभा

Semiconductor : सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये ‘स्वदेशी’ झेप; मायक्रोप्रोसेसर ‘ध्रुव-६४’चे लाँचिंग, ‘सीडॅक’ने बनविला आराखडा

Pune News : तब्बल ९२ हजार मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात; अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केल्यानंतर प्रकार उघड

Inspiring Success Story:'सामान्य शेतकऱ्याची शीतल झाली कालवा निरीक्षक'; हालाखीच्या परिस्थितीची केली ढाल, लऊळच्या मुलेचे प्रेरणादायी सुयश!

SCROLL FOR NEXT