KL Rahul esakal
Cricket

KL Rahul IND vs ENG 5th Test : राहुल आऊट तर बुमराह... पाचव्या कसोटीसाठी बीसीसीआयने संघ केला अपडेट

ND vs ENG 5th Test India Squad : भारताने धरमशाला येथे होणाऱ्या पाचव्या कसोटीसाठी आपल्या संघात बदल केला आहे. केएल राहुल अजून फिट झालेला नाही.

अनिरुद्ध संकपाळ

KL Rahul IND vs ENG 5th Test : बीसीसीआयने इंग्लंडविरूद्धच्या पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघात बदल केला आहे. केएल राहुल हा पाचव्या कसोटीला देखील मुकणार आहे. दुसरीकडे संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहला रांची कसोटीत विश्रांती दिली होती. मात्र आता त्याचा धरमशाला कसोटीत संघात समावेश करण्यात आला आहे.

केएल राहुलचा मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे तो इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतील अनेक सामने मुकला होता. तो पाचव्या कसोटीत खेळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने त्याच्या दुखापतीची आणि फिटनेसची पाहणी केली. त्यानंतर त्याच्या दुखापतीवर लंडनमधील जाणकारांकडून तपासणी करूण घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे तो पाचव्या कसोटीला मुकला आहे.

दुसरीकडे रांची कसोटीवेळी वर्क लोड मॅनेजमेंट अंतर्गत विश्रांती दिली होती. आता तो पाचव्या कसोटीसाठी संघात दाखल झाला आहे. तो धरमशाला येथे होणाऱ्या पाचव्या कसोटीत खेळणार आहे. अशाच प्रकारे मोहम्मद सिराजला देखील विश्रांती देण्यात आली होती. तो देखील एका कसोटीनंतर संघात परतला होता. आता बुमराह संघात आल्यानं एका वेगवान गोलंदाजावर कुऱ्हाड कोसळते की भारतीय संघ पाचव्या कसोटीत तीन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाज खेळवणार हे पहावे लागेल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मनसेचा मोर्चा मीरारोड ते स्थानकापर्यंत येणार

MNS Mira bhayandar Morcha: हिंदी भाषिकांच्या मोर्चाला परवानगी मग मनसेला का नाही? देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण...

Viral Video : हृदयस्पर्शी व्हिडिओ ! ममतेची मूर्ती आहे हा गोरिला, आईकडे मूल सोपवून जिंकली लाखो लोकांची मने

Supreme Court: बिहार निवडणुकीवर गहजब; मतदार याद्या सुप्रीम कोर्टाच्या दरबारात

कोविड लसीमुळे येतोय हृदयविकाराचा झटका? खरं कारण आलं समोर; AIIMS, ICMR नंतर कर्नाटक समितीच्या अहवालात काय?

SCROLL FOR NEXT