Krunal Pandya Pankhuri Sharma sons X/krunalpandya24
Cricket

Krunal Pandya Son: कृणाल पांड्या दुसऱ्यांदा झाला 'बाबा', मुलाच्या नावाचाही केला खुलासा

Krunal Pandya Son: कृणाल पांड्या आणि त्याची पत्नी पंखुडी शर्मा दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे.

Pranali Kodre

Krunal Pandya Son: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पांड्याने सर्वांना गोड बातमी दिली आहे. तो आणि त्याची पत्नी पंखुडी शर्मा दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. याबाबत त्याने सोशल मीडियावरून माहिती दिली असून मुलाच्या नावाचाही खुलासा केला आहे.

कृणालने त्याचे आणि त्याच्या पत्नी आणि मुलांबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. तसेच कॅप्शनमध्ये त्याने मुलाचे नाव सांगताना त्याची जन्मतारीखही सांगितली आहे. त्याने सांगितले की 21 एप्रिल 2024 रोजी त्याला दुसऱ्यांदा पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. तसेच त्यांनी त्यांच्या नवजात मुलाचे नाव वायू ठेवले आहे.

कृणाल आणि पंखुडी यांना यापूर्वी जुलै 2022 मध्ये पहिला मुलगा झाला होता. त्याचे नाव त्यांनी कवीर ठेवले होते. दरम्यान, दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर केलेल्या पोस्टवर कृणाल आणि पंखुडीला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

कृणाल सध्या खेळतोय आयपीएलमध्ये

कृणाल सध्या आयपीएलमध्ये खेळत असून लखनौ सुपर जायंट्स संघाचा भाग आहे. विशेष म्हणजे मुलाच्या जन्माच्या दोन दिवस आणि जन्माच्या दोन दिवस नंतर तो लखनौकडून सामनाही खेळला. कृणाल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

कृणालने 2024 आयपीएलमध्ये आत्तापर्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. त्याल फलंदाजीची फारशी संधी मिळालेली नाही, परंतु, गोलंदाजी करताना त्याने 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याची इकोनॉमीही चांगली राहिली आहे.

संजय मांजरेकरांच्या भारतीय संघात समावेश

दरम्यान आगामी टी20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने भारतीय संघात कोणकोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते, याबाबत अनेक माजी क्रिकेटपटूंनी आपले अंदाज व्यक्त केले आहेत. यात संजय मांजरेकरही असून त्यांनी त्यांच्या भारतीय संघात कृणाललाही संधी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fadnavis: मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र ठेवून माओवादी नेता भूपती शरण येणार? ६० सहकाऱ्यांसह शरणागती, १० कोटींचं होतं बक्षीस

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

PMC Election : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर; ६ नोव्हेंबरला प्रारूप तर १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार

Ajinkya Rahane: 5-6 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या खेळाडूंनी निवड समितीत असावं, नाहीतर...; रहाणेचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT