India 'A' Women announce squad for Australia tour sakal
Cricket

IND-A vs AUS-A : BCCIने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी केली टीम इंडियाची घोषणा! कर्णधारपदाची माळ 'या' खेळाडूच्या गळ्यात

भारत अ व ऑस्ट्रेलिया अ यांच्यामध्ये तीन टी-२०, तीन एकदिवसीय व एक चारदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

India 'A' Women announce squad for Australia tour : भारत अ व ऑस्ट्रेलिया अ यांच्यामध्ये तीन टी-२०, तीन एकदिवसीय व एक चारदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी भारताच्या महिला निवड समितीकडून रविवारी संघाची घोषणा करण्यात आली. मिन्नू मणी हिच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली असून श्‍वेता सेहरावत हिची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

भारत अ - ऑस्ट्रेलिया अ यांच्यामधील मालिका ७ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या दरम्यान खेळवण्यात येणार आहे. टी-२० मालिका ब्रिस्बेनमधील ॲलन बॉर्डर फिल्ड येथे खेळवण्यात येईल. एकदिवसीय मालिका मॅके येथे पार पडेल. तसेच चार दिवसीय सामना गोल्ड कोस्ट येथे आयोजित करण्यात आला आहे.

भारतीय महिला अ संघ ­­: मिन्नू मणी (कर्णधार), श्‍वेता सेहरावत (उपकर्णधार), प्रिया पुनिया, शुभा सतीश, तेजल हसबनीस, किरण नवगिरे, सजना सजीवन, उमा छेत्री (यष्टिरक्षक), शिप्रा गिरी (यष्टिरक्षक), राघवी बिष्ट, साईका इशाक, मन्नत कश्‍यप, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा, मेघना सिंग, सायली सतघारे, एस. यशश्री. (शबनीम शकील हिचा समावेश तंदुरुस्तीवर अवलंबून). पर्यायी खेळाडू ­­: साईमा ठाकोर.

भारत अ - ऑस्ट्रेलिया अ मालिकेचे वेळापत्रक

  • पहिली टी-२० - ७ ऑगस्ट

  • दुसरी टी-२० - ९ ऑगस्ट

  • तिसरी टी-२० - ११ ऑगस्ट

  • पहिली वनडे - १४ ऑगस्ट

  • दुसरी वनडे - १६ ऑगस्ट

  • तिसरी वनडे - १८ ऑगस्ट

  • चारदिवसीय सामना - २२ ते २५ ऑगस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT