Mitchell Marsh set to captain Australia in T20 World Cup 2024 Coach McDonald cricket news in marathi sakal
Cricket

T20 WC 2024 : कमिन्स नाही, तर हा स्टार खेळाडू वर्ल्डकपमध्ये करणार ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व?

T20 World Cup 2024 Australia : टी-20 वर्ल्ड कप 2024 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या या स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Australia : टी-20 वर्ल्ड कप 2024 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या या स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे.

मात्र, ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. खरं तर, ॲरॉन फिंचच्या राजीनाम्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघाचे नेतृत्व मिचेल मार्शकडे होते, तर पॅट कमिन्सने भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मध्ये संघाला विजय मिळवून दिला होता.

दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी आगामी वर्ल्ड कपसाठी मिचेल मार्शचे समर्थन केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टार अष्टपैलू मिचेल मार्शला वर्ल्ड कप स्पर्धेत संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत मार्शने संघाचे नेतृत्व केले होते.

आता एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये संघाच्या प्रशिक्षकाने मिचेल मार्शचे कौतुक केले आहे. अँड्र्यू मॅकडोनाल्डने अहवालात म्हटले आहे की, "मार्श ज्याप्रकारे टी-20 संघासोबत काम करत आहेत त्यावरून आम्ही समाधानी आहोत. आमचा विश्वास आहे की तो वर्ल्ड कपमध्ये चांगला कर्णधार होईल, आणि आता ती वेळ आली आहे.

मिचेल मार्शने 54 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1432 धावा केल्या आणि 17 विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगनेही मिचेल मार्शचे समर्थन केले आहे. तो म्हणाला, "मला वाटते की तो टी-20 कर्णधार असला पाहिजे. तो यासाठी पात्र आहे. तो एक खेळाडू म्हणून खूप परिपक्व झाला आहे. तो नक्कीच एक कर्णधार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT