Mohammad Shami Sakal
Cricket

Mohammad Shami: 'शमीला रोज १ किलो मटण नाही मिळालं तर...', मित्राने सांगितली भारी गोष्ट

Mohammad Shami Diet: मोहम्मद शमीच्या खाण्याच्या एका सवयीबाबत त्याच्या मित्रानं खुलासा केला आहे.

Pranali Kodre

Mohammad Shami Eating Habit: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्याच्या टाचेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पण आता तो या दुखापतीतून सावरत असून तंदुरुस्ती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

याचदरम्यान, त्याच्या एका मित्राने त्याच्या खाण्याच्या सवयीबद्दल मोठा खुलासा केला आहे.

शमीचा मित्र उमेश कुमारने शुभंकर मिश्राच्या युट्युब चॅनेलवर बोलताना सांगितले की जर त्याने एक किलो मटण खाल्ले नाही, तर त्याचा परिणाम त्याच्या गोलंदाजीच्या वेगावरही पडेल.

उमेश म्हणाला, 'शमी काहीही सहन करू शकतो, पण तो मटणाशिवाय राहू शकत नाही. जर त्याने मटण खाल्ले नाही, तर तो एक दिवस सहन करेल, दुसऱ्या दिवशी तो त्रस्त होईल आणि तिसऱ्या दिवशी तो वेडा होईल. जर शमीने रोज एक किलो मटण खाल्ले नाही, तर त्याच्या गोलंदाजीचा वेग जवळपास ताशी १५ किमीने कमी होईल.'

याच मुलाखतीत उमेशने असेही सांगितले होते की काही वर्षांपूर्वी जेव्हा शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ वेगळे झाले होते, तेव्हा त्याच्यासाठी तो कठीण काळ होता.

तिने त्याच्यावर घरगुती हिंसाचार आणि फिक्सिंगचेही आरोप केले होते. त्यावेळी एकाक्षणी त्याने आयुष्य संपवण्याचाही विचार केला होता, असाही खुलासा उमेशने केला होता. त्या सर्व आरोपांमधून शमीची निर्दोष सुटका झाल्यानंतर मात्र, त्याला खूप आनंद झाला होता.

दरम्यान, शमीने सध्या गोलंदाजीला सुरुवात केली असून तो सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बांगलादेश विरूद्धच्या कसोटीतून पुनरागमन करण्याची शक्यता आहे. याबाबत निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरनेही आशा व्यक्त केली आहे.

शमी वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेपासून क्रिकेट खेळलेला नाही. या स्पर्धेत त्याने २४ विकेट्स घेतल्या होत्या. परंतु त्यानंतर त्याला टाचेच्या दुखापतीने घेरले. अखेर त्याने त्यावर शस्त्रक्रिया केली. पण त्यामुळे त्याला आयपीएल २०२४ आणि टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धांना मुकावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT