Mohammed Shami Comeback ेोकोत
Cricket

Mohammed Shami : भाऊ आला रे...! प्रदीर्घ काळानंतर नेटमध्ये परतला मोहम्मद शमी; 'या' मालिकेतून करणार टीम इंडियात पुनरागमन

Mohammed Shami Return In Indian Team : एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मध्ये शानदार गोलंदाजी करणारा भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी लवकरच मैदानात परतणार आहे.

Kiran Mahanavar

Mohammed Shami Comeback : एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मध्ये शानदार गोलंदाजी करणारा भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी लवकरच मैदानात परतणार आहे. नेटमध्ये सराव करतानाचा एक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप खेळल्यापासून शमी मैदानाबाहेर आहे. या वर्षाच्या सुरुवातीला शमीचे ऑपरेशन झाले होते आणि या शस्त्रक्रियेमुळे तो आयपीएल 2024 आणि टी-20 वर्ल्ड कप आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेला मुकला होता.

सध्या शमी नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये आहे आणि तिथे त्याने नेटमध्ये गोलंदाजी सुरू केली आहे. शमीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे. सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत शमी पुनरागमन करू शकतो. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही शमीबद्दल सांगितले होते की, तो बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मालिकेतून पुनरागमन करू शकतो.

2023च्या एकदिवसीय वर्ल्ड कपदरम्यान शमीला टाचेला दुखापत झाली होती. एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर शमी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि जानेवारीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकला होता. भारतीय वेगवान गोलंदाजावर फेब्रुवारीमध्ये शस्त्रक्रिया झाली होती, ज्यामुळे तो 2024 च्या आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कपला मुकला होता. मात्र, आता त्याच्या पुनरागमनाच्या चर्चेला जोर आला आहे.

राष्ट्रीय संघात खेळणाऱ्या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटसाठी स्वत:ला उपलब्ध ठेवावे, असे बीसीसीआय सचिवांनी नुकतेच स्पष्ट केले. अशा परिस्थितीत शमी पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्येही घाम गाळू शकतो. दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळणे हा एक चांगला पर्याय असेल, ज्यामुळे त्याला सामन्यातील फिटनेस परत मिळवणे सोपे होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT