Mohammed Shami On Sania Mirza Marriage Rumours ेोकोत
Cricket

Mohammed Shami : 'हिंम्मत असेल तर...' सानिया मिर्झाशी लग्नाच्या अफवांवर संतापला शमी; म्हणाला की...

Mohammed Shami On Sania Mirza Marriage Rumours : अलीकडेच मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती.

Kiran Mahanavar

Mohammed Shami On Sania Mirza : अलीकडेच मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती. ज्यावर सानियाच्या वडिलांनी एनडीटीव्हीला दुजोरा दिला होता की, जे काही बातम्या सुरू आहेत ते पूर्णपणे मूर्खपणाचे आहेत. त्याचवेळी आता मोहम्मद शमीनेही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सानिया मिर्झासोबत लग्नाच्या अफवांवर मोहम्मद शमीने एकाच्या पॉडकास्टवर सांगितले की, लोकांनी विचारपूर्वक मीम्स तयार केलं पाहिजे कारण तो एखाद्यासाठी विनोद असू शकतो, पण तो कोणाच्या तरी आयुष्याशी संबंध आहे. शमीने अशा अफवा पसरवणाऱ्यांना आव्हान दिले की, हिंमत असेल तर त्यांनी व्हेरिफाईड पेजवरून असे काहीतरी करून दाखवावे.

सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी लग्न करणार असल्याची बातमी भारतीय वेगवान गोलंदाजाला कशी कळली? या प्रश्नाचे उत्तर देताना शमी म्हणाला, काही नाही, फोन उघडला तर तुमचाच फोटो दिसतो, त्याचे काय करणार? हे पूर्णपणे विचित्र होते. मी समजू शकतो की मीम्स मनोरंजनासाठी बनवले जातात, परंतु ते योग्य विचाराने केले जाणे आवश्यक आहे कारण कोणाचा तरी जीवन याच्याशी निगडीत आहे.

शमी पुढे म्हणाला की, “आज तुम्ही व्हेरिफाईड पेज नाही, तुमचा पत्ता माहीत नाही, तुमची माहिती माहीत नाही, त्यामुळे तुम्ही काही बोलू शकता. मला या व्यासपीठावर एकच सांगायचे आहे की तुमच्यात हिंम्मत असेल तर व्हेरिफाईड पेजवरून बोलून दाखवा. मग आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही किती पाण्यात उभे आहात.”

शेवटी तो म्हणाला की, दुसऱ्याचा पाय ओढणे किंवा दुसऱ्याला खड्ड्यात ढकलणे खूप सोपे आहे. काही यश दाखवा. तुमची पातळी थोडी वाढवा. तुमच्या कुटुंबाला तुमचा पाठिंबा दर्शवा. या चार लोकांचे भविष्य चांगले करा. मग मी मान्य करेन की तू एक चांगला माणूस आहेस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT