Mohammed Shami ruled out of IPL 2024 Marathi News sakal
Cricket

IPL 2024 : गुजरात टायटन्सला मोठा धक्का! Mohammed Shami आयपीएल मधून बाहेर, जाणून घ्या कारण

Mohammed Shami ruled out of IPL 2024 News : आयपीएल 2024 सुरू व्हायला अजून एक महिना बाकी आहे पण त्याआधी....

Kiran Mahanavar

IPL 2024 : आयपीएल 2024 सुरू व्हायला अजून एक महिना बाकी आहे. पण त्याआधी 2022 चा चॅम्पियन संघ आणि 2023 च्या उपविजेत्या गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने बीसीसीआयच्या सूत्राचा हवाला देत सांगितले की, दुखापतीमुळे मोहम्मद शमी संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्यावर ब्रिटनमध्ये शस्त्रक्रियाही होणार आहे.

गेल्या वर्षीच्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मोहम्मद शमी खेळताना दिसत नाही. शमीने 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 24 विकेट घेतल्या होत्या. त्याला नुकतेच अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शमीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 229 कसोटी, 195 एकदिवसीय आणि 24 टी-20 विकेट्स घेतल्या आहेत.

दुखापतीमुळे त्याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीही निवड झाली नाही. त्यानंतर तो सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही बाहेर झाला होता. आयपीएलनंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कप होणार आहे आणि आता त्यात शमीच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. मात्र, त्यासाठी अजून तीन महिने बाकी आहेत.

मोहम्मद शमी 2022 पासून गुजरात टायटन्सकडून खेळत आहे आणि दोन्ही हंगामात संघाला अंतिम फेरी गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आयपीएल 2022 मध्ये शमीने 16 सामन्यांमध्ये 20 विकेट घेतल्या आणि सर्वाधिक बळी घेणारा सहाव्या क्रमांकावर होता. तर 2023 मध्ये शमीने 17 सामन्यात 28 विकेट घेतल्या होत्या.

गेल्या मोसमात तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. शमीच्या गैरहजेरीमुळे गुजरात संघांचे टेन्शन वाढले आहे. हार्दिकच्या जागी शुभमन गिलची या मोसमासाठी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचवेळी, टीम लवकरच शमीच्या बदलीची घोषणा करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने! सूर्याने सांगितला आम्हाला हवं तेच झालं; Playing XI मध्ये बघा काय बदल झाला

Petrol Diesel Shortage: पेट्रोल, डिझेलची खरंच टंचाई आहे का? केंद्र सरकारकडून आलं स्पष्टीकरण

ललित प्रभाकर–विदुला चौघुलेच्या स्टायलिश लुकची चर्चा! ‘सुट्टा रोल’ पार्टी ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

Akhil Bharatiya Natya Parishad : घटनेला हरताळ फासून पदे वाटली? नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा कारभार वादाच्या भोवऱ्यात

Bihar CM: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ! 'या' ३ कारणांमुळे नितीश कुमार CM पदावरून हटणार; नवं सरकार कधी स्थापन होणार?

SCROLL FOR NEXT