MS Dhoni And Sakshi Marriage Anniversary  esakal
Cricket

MS Dhoni : 15 वर्षांची साथ अन् विश्वास; धोनी, साक्षीनं साजरा केला लग्नाचा वाढदिवस…

सकाळ डिजिटल टीम

MS Dhoni And Sakshi Marriage Anniversary : धोनी अन् साक्षी हे आज आपल्या लग्नाचा 15 वा वाढविवस साजरा करत आहेत तर यादरम्यान त्यांचा केक कापतानाचा व्हिडियो चांगलाच व्हायरल होत आहे .

भारतीय संघाचे पूर्व कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्यांची पत्नी साक्षी सिंह यांनी त्यांच्या लग्नाचा 15 वा वाढदिवस साजरा केला. अगदी साध्या पद्धतीने साजरा करत माही अन् साक्षी यांनी केक कापून एकमेकांना भरवला. ज्याचा व्हिडियो सोशल मिडियीवर चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. माही आणि साक्षी यांच्या या खास दिनी चाहते देखील आपल्या-आपल्या अंदाजात शुभेच्छा देत आहेत.

चाहत्यांची व्हिडियोला पसंदी...

या जोडप्यांचा हा व्हिडियो चाहत्यांना मात्र चांगलाच आवङला असून ते प्रेमाचा वर्षाव करीत आहेत तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. व्हिङीयोमध्ये या दोघांशिवाय एक पाळीव प्राणीसुद्धा पाहायला मिळत आहे.

साक्षीने शेयर केली खास पोस्ट

त्यांच्या या खास दिनी अनोख्या अंदाजामध्ये साक्षीने धोनीसाठी सोशल मिडियावर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या. तिने दोघांचे जुने फोटो शेअर केले. ज्यावर चाहत्यांनी पसंदी दर्शवली.

2010 मध्ये झालं होतं लग्न

धोनी आणि साक्षीची पहिली भेट एका हॉटेलमध्ये झाली. साक्षी या हॉटेलमध्ये काम करायची. यानंतर दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. अखेर 2010 मध्ये यांनी एकमेकांशी लग्न केले. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव जीवा आहे. धोनी आणि साक्षी 2015 मध्ये आई-वडील झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT