MS Dhoni Birthday Instagram
Cricket

MS Dhoni Birthday: धोनीने पत्नीबरोबर केला वाढदिवस साजरा, साक्षीने नमस्कार करत आशीर्वादही घेतले, पाहा Video

MS Dhoni: एमएस धोनी वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ त्याची पत्नी साक्षीने शेअर केला आहे.

Pranali Kodre

MS Dhoni Birthday Video: भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनी रविवारी (७ जुलै) त्याचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. धोनीच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्याला त्याच्या पत्नीनेही खास अंदाजात शुभेच्छा दिल्यात.

तिने धोनी त्याच्या वाढदिवसाचा केक कापतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी धोनी केक कापून झाल्यानंतर तिलाही तो भरवताना दिसला. इतकेच नाही, तर साक्षी धोनीच्या पाया पडून त्याचे आशीर्वादही घेताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये धोनीच्या आजूबाजूला आणखीही काही माणसं असल्याचे आवाजांवरून तरी लक्षात येत आहे. तसेच धोनीही या व्हिडिओमध्ये केक एगलेस आहे ना? असंही विचारतो. या व्हिडिओला धोनीच्या चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून अनेकांनी त्याला कमेंट्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहे.

खरंतर सध्या धोनी मुंबईत असल्याचे समजत आहे. कारण तो वाढदिवसाच्या दोन दिवसांपूर्वी बिझनेसमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नापूर्वी झालेल्या संगीत सोहळ्यासाठी उपस्थित होता. त्यावेळी साक्षीही त्याच्याबरोबर होती.

धोनी वाढदिवसाच्या गिफ्टबद्दल मानलेले भारतीय संघाचे आभार

दरम्यान, २९ जून रोजी भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कप विजयाला गवसणी घातली होती. त्याचबद्दल माजी कर्णधार धोनीने रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाचे अभिनंदन करताना हा विजय त्याच्यासाठी वाढदिवसाचे अनमोल गिफ्ट असल्याचे म्हटले होते. तसेच त्यासाठी त्याने भारतीय संघाचे आभारही मानले होते.

धोनी काही महिन्यांपूर्वीच आयपीएल २०२४ स्पर्धा खेळला होता. दरम्यान, आता हा त्याचा अखेरचा हंगाम होता की तो पुढेही खेळत राहणार, हे अद्याप त्याने स्पष्ट केलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 1st ODI: भारताने मारले रांचीचे मैदान, द. आफ्रिकेला दिली मात; कोहलीच्या शतकानंतर कुलदीप यादव-हर्षित राणा चमकले

Eknath Shinde: ठाण्यातील 'या' शहराला 'टेम्पल सिटी' बनवणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन, काय म्हणाले?

Lonavala Car Fire : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर धावत्या मोटारीला अचानक आग; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली!

Hinjewadi News : यापुढे अपघात झाला, तर मालकच जबाबदार; ‘आरएमसी’ मालक-चालकांना हिंजवडी पोलिसांची कठोर शब्दांत समज!

IND vs SA, 1st ODI: विराट कोहलीने शतक करताच रोहितने दिली शिवी? गौतम गंभीरची कशी होती रिऍक्शन? पाहा Video

SCROLL FOR NEXT