Ms Dhoni IPL2025 CSK sakal
Cricket

MS Dhoni चा IPL मधील प्रवास संपला? BCCI चा निर्णय 'गेम' करणार, धोनीची CSKच्या मालकांशी चर्चा

MS Dhoni IPL 2025 : महेंद्रसिंग धोनीने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ नंतर पुढील पर्वात खेळायचे की नाही, हा निर्णय गुलदस्त्यात ठेवला होता. आता मोठे अपडेट्स समोर येत आहेत.

Swadesh Ghanekar

MS Dhoni IPL 2025 Future : भारतीय संघाचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा इंडियन प्रीमिअर लीगमधील प्रवास संपला आहे, असं समजायला हरकत नाही. कारण, तशी चर्चा आता जोर पकडू लागली आहे आणि BCCI चा नियम चेन्नई सुपर किंग्ससोबतचा ( CSK ) कॅप्टन कूलचा प्रवास संपवण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि धोनी यांच्या चाहत्यांसाठी हा खूप मोठा धक्का असणार आहे. भारताच्या माजी यष्टिरक्षकाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि तो केवळ आयपीएल खेळतोय.

२०२३ मध्ये धोनीच्या गुडघेदुखीनं डोकं वर काढलं होत आणि तेव्हापासून त्याच्या आयपीएल खेळण्यावर चर्चा रंगल्या होत्या. मागच्या पर्वात CSK ने कर्णधारपदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवण्यात आली. त्यानंतर धोनीच्या आयपीएल २०२५ खेळण्यावर प्रश्नचिन्हांनी जोर धरला आहे. त्याचं वय हेही यामागचं कारण आहे.

महान फलंदाज धोनीचे आयपीएल २०२५ मध्ये खेळणे, हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून नाही, तर एका मिटिंगवर आहे... आयपीएल २०२५ पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे आणि येत्या ३० किंवा ३१ जुलै रोजी सर्व फ्रँचायझींची बीसीसीआयने बैठक बोलावली आहे. या बैठकीत होणाऱ्या निर्णयावर महेंद्रसिंग धोनीचे भवितव्य अवलंबून आहे. क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार धोनी त्याच्या भवितव्याबाबत CSK फ्रँचायझी मालक एन श्रीनिवास यांच्याशी चर्चा केली आहे. त्यातही हाच निर्णय झाला की बीसीसीआय मेगा ऑक्शनसाठी किती खेळाडूंना रिटेन करते, यावर पुढचा निर्णय घेतला जाईल.

IPL 2025 Mega Auction पूर्वी होणाऱ्या बैठकीत किती खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी दिली जाते हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर BCCI ने फ्रँचायझींना ५ किंवा त्यापेक्षा जास्त खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी दिली, तर धोनी CSK चा यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून खेळू शकतो. पण, जर ४ किंवा त्यापेक्षा कमी खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय झाल्यास CSK ऋतुराज, रवींद्र जडेजा, मथिशा पथिराणा आणि शिवम दुबे यांना कायम राखेल. या परिस्थितीत धोनी खेळू शकणार नाही.

पण, असे असले तरी तो CSK ची साथ सोडणार नाही हे निश्चित आहे. आयपीएल २०२५ च्या पर्वात तो CSK च्या डग आऊटमध्ये मेंटॉर म्हणून दिसू शकतो. २००८ पासून तो चेन्नई फ्रँचायझीचा सदस्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT