MCA Amol Kale 
Cricket

MCA Amol Kale: क्रिकेटविश्वात शोककळा! मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षांचे टी20 वर्ल्ड कप दरम्यान न्युयॉर्कमध्ये निधन

MCA president Amol Kale passed away: मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे न्युयॉर्कमध्ये निधन झाले आहे.

Pranali Kodre

MCA president Amol Kale passed away: भारतीय क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. नुकतेच हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने न्युयॉर्क येथे निधन झाले आहे.

अमोल कऱ्हाडकर यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार अमोल काळे यांनी रविवारी (9 जून) टी20 वर्ल्ड कपमधील न्युयॉर्कला झालेला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहिला होता. त्यांच्यासह एमसीएचे काही अधिकारी देखील होते.

सध्या चालू असलेला टी२० वर्ल्ड कप वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे होत आहे. भारताचे पहिल्या फेरीतील सामने अमेरिकेत होत आहेत. त्याचमुळे अमोल काळे हे न्युयॉर्कमध्ये असल्याचे समजते.

दरम्यान, त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर देशभरातून शोक व्यक्त होत आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही शोक व्यक्त केला आहे.

त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनाची दु:खद बातमी समजली. ते चांगले आयोजक आणि क्रिकेट चाहते होते. अमोल, जगाचा निरोप घेण्याचे वय तुझे नव्हते. माझ्यासाठी हा वैयक्तिक नुकसान आहे.

मुळचे नागपूरमधील असलेले अमोल काळे हे ऑक्टोबर 2022 मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्त झाले होते. त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूकीत माजी भारतीय क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा 25 मतांनी पराभव केला होता आणि हे अध्यक्षपद मिळवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT