rohit sharma leave mumbai indians sakal
Cricket

IPL 2025 Mega Auction: मुंबई इंडियन्स ५ जणांना करू शकते रिलीज; रोहितच्या २ भिडूंचा समावेश

IPL 2025 Mega Auction - इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठी होणाऱ्या मेगा ऑक्शनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई इंडियन्सच्या संघात बरेच बदल अपेक्षित असल्याने त्यांनी आधीच हवा केली आहे.

Swadesh Ghanekar

IPL 2025 Mega Auction Mumbai Indians may release 5 player - इंडियन प्रीमिअर लीग २०२५ ची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहोचली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मागील पर्वात मुंबई इंडियन्सला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याला कॅप्टन बनवल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर होता आणि त्यात आयपीएल २०२५ पूर्वी मुंबई इंडियन्सची साथ रोहित शर्मा सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. रोहित ते सूर्यकुमार यादव अशा पाच खेळाडूंना Mumbai Indians रिलीज करू शकतील.

रोहित शर्मा

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सर्वाधिक ५ आयपीएल जेतेपदं पटकावली. मुंबई इंडियन्स म्हणजे रोहित शर्मा हे समीकरण घट्ट झाले आहे. पण, मागील पर्वात त्याला हटवून हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवले गेले आणि हिटमॅन नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. दरम्यान, रोहित व KKR चा सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यातील नाराजीचा संवाद व्हायरलही झाला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्स रोहितला रिलीज करू शकतात.

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादव हा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याची नुकतीच टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली गेली आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये तो हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळेल का? हा प्रश्न आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सची साथ सोडेल अशी शक्यता आहे.

तिलक वर्मा

भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा म्हणून तिलक वर्माकडे पाहिले जात आहे. आयपीएल २०२४ मध्ये त्याने १३ सामन्यांत ४१६ धावा केल्या आहेत. तिलक हा रोहितच्या खूप जवळचा आहे आणि जर माजी कर्णधार फ्रँचायझीला सोडत असेल तर तिलकही बाहेर पडू शकतो

पियुष चावला

मुंबई इंडियन्ससाठी मागील काही वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांमध्ये पियुष चावला हे एक नाव आहे. मुंबईचा प्रमुख फिरकीपटू तो आहे, परंतु मुंबई इंडियन्स त्याला रिलिज करू शकतात. त्याच्याजागी युवा खेळाडू घेण्याचा त्यांचा मानस असेल.

अर्जुन तेंडुलकर

अर्जुन तेंडुलकर आयपीएल २०२१ पासून मुंबई इंडियन्ससोबत आहे. पण, त्याला पुरेशी संधी मिळालेली नाही. त्याला फ्रँचायझी रिलीज करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT