Musheer Khan  esakal
Cricket

Musheer Khan Accident : भारतीय क्रिकेटपटू रस्ता अपघातात जखमी; तीन महिने मैदानापासून दूर राहणार

Indian cricketer Accident Irani Cup : भारताचा युवा क्रिकेटपटूचा रस्ता अपघात... वडिलांसोबत करत होता प्रवास अन्...

Swadesh Ghanekar

Musheer Khan suffers road accident : भारताचा युवा स्टार फलंदाज मुशीर खान याचा रस्ता अपघात झाला आहे आणि त्यात त्याला फ्रॅक्चर झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे मुंबईचा युवा खेळाडू मुशीरला आगामी Irani Cup स्पर्धेत खेळता येणार नाही. लखनौसाठी प्रवास करत असताना हा अपघात झाला. मुशीर त्याचे वडील नौशाद यांच्यासोबत कानपूरवरून लखनौसाठी प्रवास करत होता, त्यादरम्यान हा अपघात झाला.

शेष भारतविरुद्धच्या इराणी चषकासाठीच्या लढतीसाठी निवडलेल्या मुंबई संघात मुशीर आणि त्याचा भाऊ सर्फराज यांना स्थान मिळाले होते. त्यासाठीच उत्तरप्रदेश येथे निघालेल्या मुशीर व त्याच्या वडिलांचा रस्ता अपघात झाला. १ ऑक्टोबरपासून इराणी चषकाची लढत सुरू होणार आहे. पण, या अपघातात मुशीरला फ्रॅक्चर झाल्याचे वृत्त आहे आणि त्याचे खेळणे अवघड आहे. त्याच्या दुखापतीबाबत अद्याप पूर्ण अपडेट्स समोर आलेले नाहीत. त्याच्या मानेला मार लागला आहे आणि तो तीन महिने क्रिकेटपासून दूर राहणार असल्याचे अपडेट्स हाती आले आहेत.

''तो मुंबईसंघासोबत लखनौसाठी प्रवास करत नव्हता. तो त्याच्या गावी आझमगड येथे वडिलांसोबत गेला होता आणि तेथून तो इराणी चषक सामन्यासाठी येणार होता. त्या प्रवासादरम्यान हा अपघात झाला,''असे सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.

musheer Khan

मुशीरने देशांतर्गत क्रिकेट गाजवले आहे आणि त्याने नुकत्याच झालेल्या दुलीप ट्रॉफीत पदार्पणात १८१ धावांची दमदार खेळी केली होती. मुशीरने ९ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत ३ शतकं व १ अर्धशतकांसह ७१६ धावा केल्या आहे.

मुंबईचा संघ - अजिंक्य रहाणे ( कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे, सिद्धांत अद्धातराव, शाम्स मुलानी, तनुष कोटियान, हिमांशू सिंग, शार्दूल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनेद खान, रोयस्टन डायस

शेष भारत संघ - ऋतुराज गायकवाड ( कर्णधार), अभिमन्यू इश्वरन, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, इशान किशन, मानव सुतार, सारांश जैन, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चहल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT