BPL 2024 Mustafizur Rahman esakal
Cricket

BPL 2024 Mustafizur Rahman : मुस्तफिजूर रहमान रक्तबंबाळ; डोक्याला चेंडू लागल्याने स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर

अनिरुद्ध संकपाळ

BPL 2024 Mustafizur Rahman : बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये सराव करत असताना चेंडू डोक्याला लागल्यानं दुखापतग्रस्त झाला. तो रक्तबंबाळ झाल्याने त्याला स्ट्रेचरवरून रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला रूग्णालयात दाखल करण्यापूर्वी मैदानावर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

स्कॅनचा अहवाल काय सांगतोय?

मुस्तफिजूरला रहमानला सरावादरम्यान चेंडू लागल्यानंतर त्याला त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याच्या डोक्याचा स्कॅन करण्यात आला. संघाचे फिजिओ एमएम जाहिदुल इस्लाम साजलने माध्यमांना सांगितले केले.

मुस्तफिजूरला डोक्याला दुखापत झाली आहे. त्याच्यावर कंप्रेशन बँडेजद्वारे उपचार केले आहे. त्याच्या जखमेवर टाके घातले आहेत. सध्या तो फिजिओच्या निगराणीखाली आहे.

मुस्तफिजूर रहमानने बांगलादेश लीगमध्ये 9 सामने खेळले आहेत. त्यात आतापर्यंत त्याने 23.91 च्या सरासरीने 11 विकेट्स घेतल्या आहेत. मीरपूरमध्ये झालेल्या सामन्यात मुस्तफिजूरने 32 धावात 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने लीगच्या सुरूवातीच्या सामन्यात दुरदात ढाकाविरूद्ध 31 धावात 2 विकेट्स गेतल्या होत्या. कोमिला व्हिक्टोरियाने लीगधील सात सामने जिंकले आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्येपेक्षाही भयंकर, काय होतं पंडित देशमुख हत्याकांड? बाळराजेंवर गंभीर आरोप

Inspirational Story:'जिद्दीच्या जाेरावर पोलिस हवालदार अमृत खेडकर यांनी केली सायकल रॅली यशस्वी'; १५ दिवसांत ४ हजार २५० किलोमीटर अंतर पूर्ण..

'एकटेपणा प्रचंड त्रास देतो' करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, म्हणाला...'जेवणाच्या वेळी कोणी नसल्याची..'

Gautam Gambhir: सितांशू कोटकचा खुलासा: गौतम गंभीरला दोष देणे चुकीचे, खेळपट्टी आणि फलंदाजीही जबाबदार

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात; सेन्सेक्स 150 अंकांनी घसरला; हे शेअर्स तोट्यात!

SCROLL FOR NEXT