Namibia’s Jan Nicol Loftie-Eaton Latest Marathi News sakal
Cricket

11 चौकार 8 षटकार... टी-20 मध्ये 'या' पठ्ठ्याने ठोकले सर्वात वेगवान शतक; कर्णधार रोहितला टाकले मागे

Kiran Mahanavar

Namibia’s Jan Nicol Loftie-Eaton : नामिबियाचा डावखुरा फलंदाज यान निकोल लॉफ्टी इटनने इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम त्याने केला आहे. नेपाळविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात यान निकोल लॉफ्टी इटनने अवघ्या 33 चेंडूत शानदार शतक झळकावले. यासह टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम त्याने त्याच्या नावावर केला. या बाबतीत त्याने कुशल मल्ला, डेव्हिड मिलर आणि रोहित शर्मासारख्या खेळाडूंना मागे टाकले.

मंगळवार 27 फेब्रुवारी रोजी नेदरलँड आणि नेपाळ यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात एक रेकॉर्डब्रेक सामना पाहायला मिळाला. नामिबिया संघासाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या निकोल लॉफ्टीने अशी फलंदाजी केली की अनेक महान खेळाडूंचे विक्रम मोडीत काढले. या फलंदाजाच्या शतकी खेळीमुळे संघाने नेपाळविरुद्ध 4 गडी गमावून 206 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान संघ 186 धावांत गडगडला.

नामिबियाचा फलंदाज निकोल लॉफ्टी इटनने मंगळवारी नेपाळविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात 36 चेंडूत 101 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 11 चौकार आणि 8 षटकार मारले.

टी-20 इंटरनॅशनलमध्ये सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम आता निकोल लॉफ्टीच्या नावावर आहे. 33 चेंडूत हा पराक्रम करून त्याने नेपाळच्या कुसल मल्लाचा विक्रम मोडला. त्याने मंगोलियाविरुद्ध 34 चेंडूत हा पराक्रम केला होता. तिसऱ्या क्रमांकावर भारतीय कर्णधार रोहित शर्मासह दक्षिण आफ्रिकेच्या स्फोटक डेव्हिड मिलरचे नाव आहे. दोन्ही फलंदाजांनी 35 चेंडूत शतके झळकावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT