Hardik Pandya Natasa Stankovic Divorce sakal
Cricket

Hardik Pandyaसोबत घटस्फोट घेतल्यानंतर नताशाचा फर्स्ट लुक व्हायरल! अगस्त्य व्हिडिओमध्ये काय करतोय?

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने सर्बियन मॉडेल नताशा स्टॅनकोविचला अधिकृतपणे घटस्फोट दिला आहे.

Kiran Mahanavar

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने सर्बियन मॉडेल नताशा स्टॅनकोविचला अधिकृतपणे घटस्फोट दिला आहे. घटस्फोटाची पुष्टी केल्यानंतर नताशाचा पहिला लुक समोर आला आहे, त्यामध्ये तिने मुलगा अगस्त्यचा खेळतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. नताशा सर्बियामध्ये तिच्या घरी गेली आहे आणि समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तिचा मुलगा अगस्त्य बागेत बॉलशी खेळताना दिसत आहे.

अगस्त्यचा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच नताशाने काही फोटोही शेअर केले आहेत. ज्यामध्ये नताशा सायकलिंग आणि जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. याआधी नताशा अगस्त्यसोबत मुंबई एअरपोर्टवर दिसली होती.

हार्दिक आणि नताशा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर असेच एक विधान जारी केले, ज्याद्वारे त्यांनी सांगितले की, ते लग्नाच्या 4 वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेत आहेत. हा निर्णय घेणे त्याच्यासाठी खूप अवघड होते.

हार्दिक आणि नताशा अगस्त्य बद्दल म्हणाले की, अगस्त्यच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी दोघेही शक्य ते सर्व प्रयत्न करतील. आता तो सध्या सर्बियामध्ये नताशासोबत आहे.

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांची 1 जानेवारी 2020 रोजी एंगेजमेंट झाली. यानंतर, कोविड काळात 31 मे 2020 रोजी लग्न केले. 30 जुलै 2020 रोजी नताशाने मुलगा अगस्त्याला जन्म दिला. 14 फेब्रुवारी 2023 रोजी, हार्दिक आणि नताशाचे उदयपूरमध्ये दुसरे लग्न झाले.

नताशा स्टॅनकोविक ही सर्बियन मॉडेल आहे. 2012 मध्ये ती भारतात आली होती. त्या दिवसांत नताशाने बॉलीवूडमध्ये नशीब आजमावले आणि प्रकाश झा यांच्या सत्याग्रह या चित्रपटात आयटम साँगही केले. यानंतर नताशा बिग बॉस 8 आणि नच बलिए सारख्या शोचा भाग होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT