Natasa Stankovic reaction on Divorce Rumors With Hardik Pandya sakal
Cricket

Hardik Pandya Natasa Stankovic : 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली पांड्याची पत्नी नताशा, घटस्फोटाच्या बातमीवर काय म्हणाली?

हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

Kiran Mahanavar

Natasa Stankovic reaction on Divorce Rumors With Hardik Pandya : हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की दोघेही घटस्फोट घेणार आहेत. या सगळ्यामध्ये हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविक एका 'मिस्ट्री मॅन'सोबत स्पॉट झाली आहे. यानंतर घटस्फोटाची बातमी खरी आहे का, असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होऊ लागले आहेत.

हार्दिक आणि नताशा यांच्यात घटस्फोट होऊ शकतो, अशी चर्चा अनेक दिवसांपासून मीडियामध्ये येत होती. मात्र, अद्याप यासंदर्भात दोन्ही बाजूंनी कोणतेही मोठे वक्तव्य आलेले नाही. या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे, याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही, मात्र याआधी नताशा स्टॅनकोविच एका 'मिस्ट्री मॅन'सोबत स्पॉट झाली होती आणि यानंतर ही चर्चा अधिकच वाढली आहे.

'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली नताशा स्टॅनकोविक

नताशा स्टॅनकोविचचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती एका मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली आहे. दैनिक जागरणच्या बातमीनुसार, ही व्यक्ती दुसरी कोणी नसून अभिनेत्री दिशा पटानीचा मित्र आणि फिटनेस ट्रेलन अलेक्झांडर अलिक आहे, जो नताशाचा पण मित्र आहे. यावेळी पत्रकारांनी नताशाला हार्दिकसोबत घटस्फोटाच्या बातम्यांबद्दल प्रश्न विचारले, ज्याला नताशा काहीच उत्तर देत नाही आणि तिच्या गाडीत बसते.

घटस्फोटाच्या अफवांदरम्यान, सोशल मीडियावर आणखी एक मोठी बातमी व्हायरल झाली ती म्हणजे जर हार्दिक आणि नताशा यांचा घटस्फोट झाला तर पांड्याची 70 टक्के संपत्ती त्याच्या पत्नीच्या नावावर जाईल.

हार्दिक पांड्याकडे सध्या 91 कोटी रुपयांची संपत्ती आहे. वडोदरा येथे त्यांचे 6000 स्क्वेअर फुटांचे पेंटहाऊस आहे. त्याची किंमत सुमारे 3.6 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय हार्दिक पांड्याचे मुंबईतील वांद्रे येथेही एक अपार्टमेंट आहे. हे आठ खोल्यांचे अपार्टमेंट 3838 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे आणि त्याची किंमत सुमारे 30 कोटी रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT