Neeraj Chopra esakal
Cricket

Neeraj Chopra : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा आज उतरणार मैदानात, जाणून घ्या कधी अन् किती वाजता सुरू होणार सामना?

टोकियो ऑलिंपिकमध्ये भालाफेकीत जिंकलेल्या सुवर्णपदकाचा पॅरिसमध्ये बचाव करण्यासाठी भारताचा ‘वंडर बॉय' नीरज चोप्रा सज्ज झाला असून आज, मंगळवारपासून तो आपल्या अभियानाला सुरुवात करणार आहे.

Kiran Mahanavar

Neeraj Chopra Qualification Live Streaming : टोकियो ऑलिंपिकमध्ये भालाफेकीत जिंकलेल्या सुवर्णपदकाचा पॅरिसमध्ये बचाव करण्यासाठी भारताचा ‘वंडर बॉय' नीरज चोप्रा सज्ज झाला असून आज, मंगळवारपासून तो आपल्या अभियानाला सुरुवात करणार आहे. अंतिम फेरी आठ तारखेला होणार असली तरी त्याच्या तयारीची एक झलक पात्रता फेरीत पाहायला मिळू शकते. नीरजप्रमाणे भारताचा किशोर जेनानेही आपला दावा मजबूत केला आहे.

ऑलिंपिकमध्ये सहभागी व्हायचे असल्याने सावधगिरी म्हणून नीरजने पॅरिस डायमंड लीगमधून माघार घेतली होती. मात्र, त्याचा ऑलिंपिकमधील कामगिरीवर परिणाम होणार नाही, असे नीरज म्हणाला होता. त्यामुळे नीरजची तयारी कशी झाली आहे, याचा अंदाज पात्रता फेरीतील कामगिरीवरून घेता येऊ शकेल. २०१३ मध्ये ज्यावेळी नीरजने राष्ट्रीय युवा स्पर्धेत भाग घेतला त्यावेळी निश्चितच ऑलिंपिक सुवर्णपदकाचे स्वप्न उराशी बाळगले असेल.

मात्र, सलग दोन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकाचा विचार त्याने बहुधा त्यावेळी केला नसेल. आता ही ऐतिहासिक कामगिरीची वेळ येऊन ठेपली आहे. पात्रता फेरीत नीरजचा ‘ब' गटात समावेश असून त्याच्या गटात जर्मनीचा युवा भालाफेकपटू मॅक्स डेहनिंग, पाकिस्तानचा अर्शद नदीम, माजी विश्वविजेता ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे.

अंतिम फेरीसाठी ८४ मीटर अशी पात्रता ठेवण्यात आली आहे. अन्यथा दोन्ही गटातील मिळून सर्वोत्तम १२ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. त्यामुळे नीरजला अंतिम फेरी गाठणे अवघड नाही, असेच चित्र आहे. यंदा त्याने दोहा डायमंड लीगमध्ये ८८.३६ मीटर अशी सर्वोत्तम कामगिरी केली होती. विशेष म्हणजे स्टेट डे फ्रान्स स्टेडियमचा ट्रॅक नीरजच्या शैलीला साजेसा आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे तो सुवर्णपदकाच्या आणखी जवळ गेला आहे.

भारताचा दुसरा भालाफेकपटू किशोर जेनाचा ‘अ‘ गटात समावेश असून त्याने गेल्यावर्षी जागतिक स्पर्धेत पाचवे स्थान मिळविले होते. त्याची तयारीही उत्तम आहे. त्यामुळे तो सुद्धा अंतिम फेरी गाठेल, अशी अपेक्षा आहे. त्याच्या गटात माजी विश्वविजेता केनियाचा ज्युलियस येगो, त्रिनिदादचा केशॉन वॉलकॉट, टोकियोतील रौप्यपदक विजेता झेकचा जाकुब वाल्डेज या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे.

पात्रता फेरी

६ ऑगस्ट - ‘अ‘ गट - दुपारी १.५० ‘ब' गट - दुपारी ३.२०

अंतिम फेरी

८ ऑगस्ट - ११.५५

नीरज चोप्रा

(सर्वोत्तम कामगिरी - ८९.९४ मीटर, मोसमातील सर्वोत्तम - ८८.३६ मीटर)

किशोर जेना

(सर्वोत्तम कामगिरी - ८७.५४ मीटर, मोसमातील सर्वोत्तम - ८०.८४ मीटर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

Teachers Award : १०९ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर; पुणे जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा समावेश

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

SCROLL FOR NEXT