NZ vs SA 2nd Test esakal
Cricket

NZ vs SA 2nd Test : अखेर आफ्रिका झाली सर! 92 वर्षे अन् 18 प्रयत्नांनंतर न्यूझीलंडने रचला इतिहास

NZ vs SA 2nd Test : न्यूझीलंडने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला दिला व्हाईट वॉश

अनिरुद्ध संकपाळ

New Zealand vs South Africa 2nd Test : हॅमिल्टन येथील दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सनी पराभव केला. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरूद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका 2 - 0 अशी जिंकली. न्यूझीलंडसाठी हा विजय खूप खास आहे. कारण या विजयासाठी न्यूझीलंडने 92 वर्षे वाट पाहिली आहे. त्यांना या मालिका विजयासाठी 18 वेळा प्रयत्न करावा लागले.

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका या 1932 पासून सुरू झाल्या आहेत. मात्र न्यूझीलंडला एकदाही दक्षिण आफ्रिकेवर मात करता आली नव्हती.

हॅमिल्टन कसोटीत चौथ्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी 266 धावांची गरज होती. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने नाबाद 133 धावा ठोकल्या. तर विल यंगने नाबाद 63 धावा केल्या. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने या शतकी खेळीबरोबरच एक मोठा विक्रम देखील केला. तो सर्वात वेगाने (इनिंग) 32 वे कसोटी शतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे.

दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 242 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेकडून रूआन दे स्वार्दतने सर्वाधिक 64 धावा केल्या. न्यूझीलंडकडून विलियम रोर्कीने 4 तर रविचंद्रन अश्विनने 3 विकेट्स घेतल्या होत्या.

यानंतर न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात 211 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 31 धावांची आघाडी घेतली. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात देखील केन विलियमसनने सर्वाधिक 43 धावा केल्या. तर सलामीवीर लॅथमने 40 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून पेडिटने सर्वाधिक 5 तर डेन पॅटरसनने 3 विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या डावात बेडिंगहमच्या झुंजार शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 235 धावा करत न्यूझीलंडसमोर विजयासाठी 266 धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान न्यूझीलंडने 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं. केन विलियमसनने नाबाद 133 तर विल यंगने नाबाद 60 धावांची खेळी केली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT