Neil Wagner retires from test cricket Marathi News sakal
Cricket

Neil Wagner Retires : क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का! संघातून वगळल्यानंतर दिग्गज खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती

Neil Wagner New zealand News : क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

Kiran Mahanavar

Neil Wagner Retires : क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू नील वॅग्नरने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याची निवड होणार नसल्याचे निवडकर्त्यांनी सांगितल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

29 फेब्रुवारीपासून न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. यासाठी न्यूझीलंडने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. पण नील वॅग्नरचा त्यात समावेश नव्हता. वॅग्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने न्यूझीलंडसाठी अनेक वेळा चमकदार कामगिरी केली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत नील वॅग्नरला स्थान मिळालेले नाही. यानंतर त्यांनी निवृत्ती जाहीर केली. आयसीसीच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, नील वॅग्नर म्हणाला की, हा आठवडा खूप भावनिक गेला. ज्याच्याशी तुम्ही बर्याच काळापासून संबंधित आहात त्यापासून तुम्ही सहजपणे दूर जाऊ शकत नाही. न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळताना प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. मी माझी पत्नीचे आभार मानू इच्छितो. त्याने मला खूप साथ दिली आहे.

नील वॅग्नरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सोपी राहिली नव्हती. त्याला अनेकवेळा संघातून बाहेर राहावे लागले आहे. वॅग्नरने टीम इंडियाविरुद्ध चमकदार कामगिरी करून खूप नाव कमावले होते. खरंतर, 2014 मध्ये भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. यावेळी ऑकलंडमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. जेथे त्याने भारताविरुद्धच्या पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावातही चार विकेट्स घेतल्या होत्या. या कसोटीत एकूण 8 विकेट घेत तो चर्चेचा विषय ठरला होता.

दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या नील वॅग्नरने आपल्या कारकिर्दीत न्यूझीलंडकडून एकूण 64 कसोटी सामने खेळले. या कालावधीत त्याने केवळ 52.7 च्या स्ट्राइक रेटने 27.57 च्या सरासरीने 260 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत नील वॅग्नर पाचव्या क्रमांकावर आहे. मात्र तो प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan News: आर्थिक संकटात पाकिस्तानचा मोठा यू-टर्न! इस्लामच्या नावाखाली 50 वर्षांपूर्वी बंद केलेली ‘ही’ गोष्ट पुन्हा सुरू

Loni Kalbhor Crime: लोणी काळभोरमध्ये गावठी दारू अड्ड्यावर छापा; ३५० लिटर रसायनमिश्रित दारू नष्ट, तिघांवर गुन्हा..

Pune Nasrapur crime: आरोपीला मध्यरात्री घटनास्थळी नेले अन्... ; नसरापूर अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

Angarki Sankashti 2026 : गणपतीपुळेत लोटला भाविकांचा महासागर! अंगारकीला 70 हजार भक्तांनी घेतले दर्शन; 80 लाखांची उलाढाल

Jalna Crime: पारधमध्ये ‘लव्ह जिहाद’! दहा वर्षांपासून पीडितेवर अत्याचार, जालन्यातून दोन संशयित अटकेत!

SCROLL FOR NEXT