Nitish Reddy Rinku Singh Fifty | India vs Bangladesh, 2nd T20I Sakal
Cricket

Record तोड खेळी! नितीश रेड्डी-रिंकू सिंगची जमली जोडी; लोकेश राहुल-MS Dhoni चा मोडला विक्रम

India vs Bangaldesh 2nd T20I Records: दिल्लीमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश संघात दुसरा टी२० सामना खेळला गेला. या सामन्यात नितीश कुमार रेड्डी आणि रिंकू सिंग यांनी अर्धशतके करत भारताला द्विशतकी धावसंख्या उभारून देताना मोठे विक्रमही केले.

Pranali Kodre

Nitish Reddy Rinku Singh Fifty Record: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर बुधवारी भारत विरुद्ध बांगलादेश संघात दुसरा टी२० सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद २२१ धावा आणि बांगलादेशसमोर विजयासाठी २२२ धावांचे आव्हान ठेवले.

भारताला द्विशतकी धावसंख्या उभारून देण्यात नितीश कुमार रेड्डी आणि रिंकू सिंग यांचा मोठा वाटा राहिला. या दोघांनीही खणखणीत अर्धशतके ठोकली.

या सामन्यात भारताने ४१ धावांतच ३ विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर नितीश आणि रिंकू यांची जोडी जमली. त्यांनी आक्रमक शॉट्स खेळताना अर्धशतके झळकावली. तसेच त्यांनी ४९ चेंडूतच १०८ धावांची भागीदारी चौथ्या विकेटसाठी केली.

नितीशने २७ चेंडूत आणि रिंकूने २६ चेंडूत अर्धशतके केली. दरम्यान, नितीश ३४ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारांसह ७४ धावांची खेळी करून बाद झाला, तर रिंकू २९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावा करून बाद झाला. पण या दोघांनी काही विक्रम केले आहेत.

विक्रमी भागीदारी

रिंकू आणि नितीश यांच्यात झालेली १०८ धावांची भागीदारी ही आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील भारताकडून चौथ्या विकेटसाठी केलेली तिसरी सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. त्यामुळे त्यांनी केएल राहुल आणि एमएस धोनी यांच्या जोडीला मागे टाकले आहे.

राहुल आणि धोनी यांनी २०१६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १०७ धावांची भागीदारी चौथ्या विकेटसाठी केली होती.

या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा यांची जोडी आहे. त्यांनी २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या विकेटसाठी नाबाद १४१ धावांची भागीदारी केली होती. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांनी २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध ११९ धावांची भागीदारी केली होती.

नितीशचाही विक्रम

नितीश हा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये अर्धशतक झळकावणारा भारताचा चौथ्या क्रमांकाचा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. त्याने हे अर्धशतक केले, तेव्हा त्याचे वय २१ वर्षे १३६ दिवस इतके होते. त्याच्यापुढे रोहित शर्मा, तिलक वर्मा आणि ऋषभ पंत आहे.

भारतासाठी सर्वात कमी वयात टी२० मध्ये पहिले अर्धशतक झळकावणारे फलंदाज

  • २० वर्षे १४३ दिवस - रोहित शर्मा

  • २० वर्षे २७१ दिवस - तिलक वर्मा

  • २१ वर्षे ३८ दिवस - ऋषभ पंत

  • २१ वर्षे १३६ दिवस - नितीश कुमार रेड्डी

भारताचेही विक्रम

या सामन्यात भारताने २० षटकात १५ षटकार ठोकले. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध एका टी२० सामन्यात एखाद्या संघाने ठोकलेले सर्वाधिक षटकार आहेत.

यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर होता. त्यांनी २०१२ मध्ये मीरपूरला झालेल्या टी२० सामन्यात १४ षटकार मारले होते.

तसेच भारताने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्याही उभारली आहे.

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सर्वोच्च धावसंख्या

  • २२४/४ - दक्षिण आफ्रिका, पॉचेफस्ट्रूम, २०१७

  • २२१/९ - भारत, दिल्ली, २०२४

  • २१४/६ - श्रीलंका, कोलंबो, २०१८

  • २१०/३ - न्यूझीलंड, हेमिल्टन, २०२१

  • २१०/४ - श्रीलंका, सिलहेत, २०१८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : नोकरीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक

SCROLL FOR NEXT