Hardik Pandya T20 WC 2024
Hardik Pandya T20 WC 2024 esakal
क्रिकेट

Hardik Pandya : सेहवागनं निवडली टी 20 वर्ल्डकपसाठी भारताची Playing 11; पांड्याला संघात 'घेऊन' केला अपमान

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya T20 WC 2024 : भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर विरेंद्र सेहवागने आगामी टी 20 वर्ल्डकपसाठी त्याच्या दृष्टीकोणातून भारताचा संघ निवडला आहे. या संघात सर्वात मोठा धक्का त्यानं मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराला दिला आहे.

सेहवागनं हार्दिक पांड्याला आपल्या टी 20 वर्ल्डकपच्या प्लेईंग 11 मध्ये स्थानच दिलेलं नाही. सेहवाग म्हणाला की तो भारताच्या 15 खेळाडूंमध्ये असेल मात्र फिनिशर म्हणून रिंकू सिंह किंवा शिवम दुबे या दोघांपैकी एक प्लेईंग 11 मध्ये खेळेल.

विरेंद्र सेहवागने भारतीय प्लेईंग 11 मध्ये बरेच काही बदल केले आहेत. यात हार्दिक पांड्याला तर वगळलंच आहे. मात्र राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माला त्यानं प्लेईंग 11 मध्ये संधी दिली आहे. त्यानं भारताच्या टॉप ऑर्डरमध्ये फारसा काही बदल केलेला नाही.

सेहवागच्या मते रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल सलामीला येतील. विराट कोहली त्याच्या त्याच्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. तर सूर्यकुमार यादव हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार आहे.

संघात पुनरागमन करणारा ऋषभ पंत मधल्या फळीत फलंदाजी करेल. फिनिशर म्हणून रिंकू सिंह किंवा शिवम दुबे यापैकी एक जण सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केल. रविंद्र जडेजा हा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल.

याचबरोबर गोलंदाजीत कुलदीप यादव हा फिरकीपटू म्हणून संघात खेळेल. त्यानंतर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि संदीप शर्मा अशी वेगवान गोलंदाजांची फळी असेल. संदीप शर्मासाठी यंदाचा आयपीएल हंगाम जबरदस्त गेला आहे. त्यामुळे विरेंद्र सेहवागने त्याला भारताच्या टी 20 वर्ल्डकप संघात प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलं आहे.

विरेंद्र सेहवागने निवडलेली टी 20 वर्ल्डकपसाठी भारताची प्लेईंग 11

रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रिंकू सिंह/शिवम दुबे, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, संदीप शर्मा.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT