Ollie Robinson Sakal
Cricket

43 Runs in an Over: अबब! एक ओव्हर अन् 43 धावा... 134 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात इंग्लंडच्या गोलंदाजाचा लाजिरवाणा विक्रम

Ollie Robinson: इंग्लंडच्या ऑली रॉबिन्सनने एकाच षटकात तब्बल 43 धावा खर्च करण्याचा नकोसा विक्रम नोंदवला आहे.

Pranali Kodre

County Championship, Sussex vs Leicestershire: क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत काही मोजक्या खेळाडूंनी सहा चेंडूत सहा षटकार मारत ३६ धावा काढल्याचे अनेकांनी पाहिले आणि ऐकले असेल. पण नुकताच क्रिकेटमध्ये एक इतिहास घडला आहे.

इंग्लंडमध्ये चालू असलेल्या काऊंटी चॅम्पियनशीपच्या एका सामन्यात एका षटकात तब्बल ४३ धावा गोलंदाजांनं खर्च केल्या आहेत, हा गोलंदाज म्हणजे इंग्लंडचा अष्टपैलू ऑली रॉबिन्सन. त्यामुळे त्याच्या नावावर नकोसा विक्रमही नोंदवला गेला आहे.

झाले असे की २३ ते २६ जून दरम्यान ससेक्स विरुद्ध लीसेस्टरशायर यांच्यात सामना झाला. या सामन्यात ससेक्सने पहिल्या डावात ४४२ धावा आणि दुसऱ्या डाव २९६ धावांवर घोषित करत लीसेस्टरशायरसमोर ४६४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. लीसेस्टरशायरचा पहिला डाव २७५ धावांवर संपला होता.

दरम्यान, दुसऱ्या डावातही लीसेस्टरशायर सुरुवातीला संघर्ष करत होते. त्यांनी ४३ व्या षटकात १४४ धाावंवरच ६ विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर ८ व्या क्रमांकावर लुईस किम्बर फलंदाजीला उतरला आणि त्याने आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. त्याने चौकार षटकारांची बरसात करत अर्धशतकही नोंदवले.

त्यावेळी ५९ व्या षटकात ऑली रॉबिन्सन ससेक्सकडून गोलंदाजीसाठी आला. त्याच्याविरूद्धही किम्बरने आक्रमक पवित्रा स्विकारला. त्याने या षटकात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतरचा चेंडू रॉबिन्सनने नोबॉल टाकला, ज्यावर चौकार गेला.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की काऊंटी क्रिकेटमध्ये नोबॉलवर पेनल्टी म्हणून २ धावा दिल्या जातात. त्यामुळे दुसऱ्या चेंडूवर लीसेस्टरशायरला चौकार आणि नोबॉलच्या २ धावा अशा ६ धावा मिळाल्या.

त्यानंतर टाकलेल्या तीन चेंडूवर किम्बरने अनुक्रमे चौकार, षटकार आणि चौकार मारला. पण पुन्हा अधिकृत पाचवा चेंडू रॉबिन्सनने नोबॉल टाकला, ज्यावही चौकार गेला, त्यामुळे संघाला ६ धावा मिळाल्या. त्यामुळे पुन्हा टाकलेल्या पाचव्या चेंडूवर किम्बरने चौकार ठोकला.

रॉबिन्सनने शेवटच्या चेंडूवरही चूक करत नोबॉल टाकला आणि या नोबॉलवरही चौकार मिळाल्याने लीसेस्टरशायरला ६ धावा मिळाल्या. अखेर शेवटच्या अधिकृत चेंडूवर रॉबिन्सनने एकच धाव दिला.

मात्र, या संपूर्ण षटकात त्याने एकूण ४३ धावा खर्च केल्या. त्यामुळे तो काऊंटी चॅम्पियनशीपच्या १३४ वर्षांच्या इतिहासात एका षटकात सर्वाधिक धावा खर्च करणारा गोलंदाज ठरला आहे.

दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की किम्बरने त्याची फटकेबाजी पुढेही चालू ठेवत द्विशतक झळकावले. मात्र तो बाद झाल्यानंतर लीसेस्टरशायरला अवघ्या १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

464 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लीसेस्टरशायर संघ ४४५ धावांवर सर्वबाद झाला. किम्बरने १२७ चेंडूत २४३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने २० चौकार आणि २१ षटकार मारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif: कागलमध्ये समेट! हसन मुश्रीफांच्या सून बिनविरोध; शिंदे गटाने घेतली माघार

PM Kisan 21st Installment : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान योजनेचा २१वा हप्ता केला जारी

U19 World Cup 2026 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! भारताचे सामने कुठे आणि कधी होणार? जाणून घ्या

मुंबईत भरदिवसा बिल्डरवर झाडल्या गोळ्या, दोन गोळ्या पोटात घुसल्या; गोळीबाराच्या घटनेनं खळबळ

Anmol Bishnoi: अखेर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला भारतात आणलं; NIA कडून अटक, कसा बनला भारतातील 'मोस्ट वॉन्टेड'?

SCROLL FOR NEXT