Kamran Ghulam esakal
Cricket

PAK vs ENG 2nd Test : कोण आहे Kamran Ghulam? पहिल्याच कसोटीत Century अन् Babar Azam च्या स्थानाला दिले आव्हान

Pakistan vs England 2nd Test : पहिल्या कसोटीत दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तानने संघात बदल केले. बाबर आजम, शाहिन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांना बाकावर बसवून नव्या खेळाडूंना संधी दिली.

Swadesh Ghanekar

Pakistan vs England 2nd Test Kamran Ghulam Century : पाकिस्तानने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगले उत्तर दिले आहे. पहिल्या कसोटीत डावाने पराभव पत्करावा लागल्यामुळे पाकिस्तानच्या संघावर चौफेर टीका झाली होती. संघातील सीनियर्स खेळाडूंचा फॉर्म हा चिंतेचा विषय निवड समितीने या खेळाडूंना संघाबाहेर करून सोडवला. त्यामुळेच काही नवीन चेहरे दुसऱ्या कसोटीत दिसले आणि तब्बल १२ वर्षांनंतर एका खेळाडूला कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर अब्दुल्ला शफिक ( ७) व कर्णधार शान मसूद ( ३) यांना जॅक लिचने स्वस्तात बाद केले. इंग्लंडने सुरुवातीच्या षटकात फिरकीपटूला आणून पाकिस्तानला आश्चर्याचा धक्का दिला. इंग्लंडच्या संघातही मॅथ्यू पॉट्स व बेन स्टोक्स यांचे पुनरागमन झाले. १९ धावांत २ विकेट्स गमावल्यानंतर सईस आयूब व पदार्पणवीर कामरान गुलाम यांनी तिसऱ्या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी करून पाकिस्तानचा डाव सावरला. पॉट्सने ही जोडी तोडली. आयूब १६० चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ७७ धावांवर स्टोक्सच्या हाती झेल देऊन परतला.

ब्रेडन कार्सने पाकिस्तानला चौथा धक्का देताना सौद शकिलची ( ४) विकेट घेतली. एका बाजूने कामरान गुलाम खिंड लढवत राहिला. त्याने १९३ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारांसह १०२ धावांची खेळी केली. त्याला मोहम्मद रिझवान साथ देतोय आणि दोघांनी संघाला ७५ षटकांत ४ बाद २२३ धावांपर्यंत पोहोचवले आहे.

Hundred in Test debut

कोण आहे कामरान गुलाम?

  • कामरानने २०१३ मध्ये १७ वर्षांचा असताना पाकिस्तानकडून वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. २०१३ मध्ये पाकिस्तानच्या १९ वर्षांखालील संघाकडून वर्ल्ड कप फायनलही खेळला होता. त्यानंतर १० वर्षांनी त्याला सीनियर्स संघाकडून वन डे क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आणि आज त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

  • त्याने ५९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४३७७ धावा केल्या आहेत. त्यात १६ शतकं व २० अर्धशतकांचा समावेश आहे. ९४ लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३३४४ धावा आहेत, तर ७३ ट्वेंटी-२० सामन्यांत १५१० धावा त्याने केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Women’s World Cup 2025 Ind vs Pak : आज भारत-पाकिस्तान आमनेसामने, महिला खेळाडू हस्तांदोलन करणार?

MPSC 2025: खुल्या प्रवर्गाने परीक्षा द्यायची नाही का? ‘राज्य कर निरीक्षक’ पदासाठी शून्य जागा; विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT