PAK vs ENG 2nd Test  esakal
Cricket

PAK vs ENG 2nd Test : पाकिस्तानचा डाव गडगडला, १०७ धावांवर उर्वरित संघ इंग्लंडने माघारी पाठवला

Pakistan vs England 2nd Test : मुलतान कसोटीचा पहिला दिवस पाकिस्तानने गाजवला असला तरी दुसऱ्या दिवशी इंग्लंडने धक्का दिला.

Swadesh Ghanekar

Pakistan vs England Multan 2nd Test : पदार्पणवीर कामरान गुलाम ( Kamran Ghulam) याच्या शतकी खेळीने दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. पण, इंग्लंडने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पुनरागमन करताना पाकिस्तानचा उर्वरित निम्मा संघ १०७ धावांत गुंडाळला.

पहिल्या कसोटीतील पराभवानंतर पाकिस्तानने संघात काही बदल केले. बाबर आझम, शाहिन आफ्रिदी, नसीम शाह यांना बाकावर बसवले. बाबरच्या जागी संघात स्थान मिळालेल्या कामरान गुलामने २२४ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारांसह ११८ धावांची खेळी केली. सईम आयूबने ७७ धावांची खेळी करून कामरानला चांगली साथ दिली. मोहम्मद रिझवान ( ४१) व सलमान आघा ( ३१) यांनी चांगला खेळ केला होता. पाकिस्तानने पहिल्या दिवशी ५ बाद २५९ धावा उभ्या केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आणि इंग्लंडच्या गोलंदाजांनी फास आवळला..

अवघ्या पाच धावांची भर घालून पाकिस्तानला मोठा धक्का बसला. मोहम्मद रिझवानला ब्रेडन कार्सने माघारी पाठवले. साजीद खान ( २) जॅक लिचच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पाठोपाठ सलमान आघाही माघारी परतल्याने पाकिस्तानचा संघ अडचणीत आला होता. आमेर जमाल व नोमान अली यांनी ९व्या विकेटसाठी धावांची भागीदारी करून इंग्लंडला बॅकफूटवर फेकण्याचा प्रयत्न केला. कार्सने ही जोडी तोडली आणि जमाल ३७ धावांवर माघारी परतला. नोमान अलीची ( ३२) विकेट घेऊन लिचने पाकिस्तानचा पहिला डाव ३६६ धावांवर गुंडाळला.जॅक लिचने ४ विकेट्स घेतल्या. ब्रेडन कार्सने ३ व मॅथ्यू पॉट्सने दोन विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

Pune Land Scam : निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा; १९ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण!

SCROLL FOR NEXT