India vs Pakistan Sakal
Cricket

Champions Trophy 2025: पाकिस्तानची लगीनघाई! स्पर्धेच्या शेड्युलचा ड्राफ्ट तयार, भारतीय संघाचे सामने ठरवले 'या' शहरात

India vs Pakistan: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या पाकिस्तानचा दौऱ्यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. असे असतानाही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मात्र स्पर्धेच्या आयोजनाच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे.

Pranali Kodre

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आहे. अशात पुढच्यावर्षी होणाऱ्या या स्पर्धेसाठी पाकिस्तानने चांगलीच कंबर कसल्याची दिसून येत आहे. त्यांनी अनेक वर्षांनी आयसीसी स्पर्धा आयोजित करण्यासाठी मोठी तयारी सुरू केली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच अशी माहिती मिळाली होती की पाकिस्तान कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे या स्पर्धेतील सामने आयोजित करण्याचा विचार करत आहेत.

आता इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानने या स्पर्धेच्या वेळापत्रकाचा जो ड्राफ्ट बनवला आहे, त्यानुसार भारताचे सर्व सामने लाहोरला खेळवण्याची योजना आहे. लाहोरला अंतिम सामना खेळवण्याचाही विचार आहे.

भारताचे सामने एकाच शहरात ठेवण्यामागे कारण म्हणजे यामुळे भारतीय संघाच्या सुरक्षितेबाबत आणि प्रवासावेळी उद्भवणाऱ्या समस्यांना टाळता येईल. याशिवाय लाहोर हे वाघा बॉर्डरच्या जवळ असल्याने भारतीय चाहत्यांना प्रवासासाठी सोपा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

पाकिस्तान क्रिकेट बार्डाचे अध्यक्ष मोहसिन नाकवी यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की त्यांनी स्पर्धेच्या वेळापत्रकाचा ड्राफ्ट आयसीसीकडे पाठवला आहे. ही स्पर्धा पुढीलवर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू होऊ शकते.

दरम्यान, या स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आठही संघ पाकिस्तानला जाणार की नाही, यावर अद्याप निर्णय व्हायचा आहे; विशेषत: भारतीय संघाबाबत.

भारताने गेल्या 17 वर्षात एकदाही पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. पण आता 17 वर्षांनी भारतीय संघ पाकिस्तान दौरा करणार की नाही, याबाबतचा निर्णय भारत सरकार आणि बीसीसीआयच्या हातात आहे.

गेल्यावर्षी पाकिस्तान आशिया चषक स्पर्धेचाही आयोजक होता. मात्र भारतीय संघाला पाकिस्तानला जाण्यास नकार मिळाल्याने हायब्रिड मॉडेलमध्ये ही स्पर्धा पार पडली. यामध्ये भारताचे सर्व सामने तसेच अंतिम सामनाही श्रीलंकेमध्ये झाला होता. तसेच त्यानंतर झालेल्या 2023 वनडे वर्ल्डकपसाठी पाकिस्तानने भारताचा दौरा केला होता.

दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की 2009 मध्ये श्रीलंका संघावर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये 6 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवले गेले नव्हते. पण 2015 पासून पाकिस्तानमध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू झाले.

त्यानंतर गेल्या 8 वर्षात बऱ्याच संघांनी पाकिस्तान दौरा केला आहे. यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या 8 संघांपैकी भारत वगळता सर्व संघांनी पाकिस्तानचा दौरा केला आहे.

त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत अंतिम निर्णय कधी घेतले जाणार, हे पाहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT