Pakistan Cricket News Viral Video 
Cricket

Pakistan Cricket News : लाईव्ह चर्चेदरम्यान पाकिस्तानी क्रिकेट एक्सपर्टची पत्नीला मारहाण; VIDEO होतोय व्हायरल

Pakistan Cricket Viral Video :

अनिरुद्ध संकपाळ

Pakistan Cricket News : पाकिस्तान क्रिकेट अन् वाद यांच एक वेगळंच नातं आहे. यापूर्वी क्रिकेटपटू अन् संघटनेबाबत वाद किंवा अजब गोष्टी घडत होत्या. आता पाकिस्तानातील क्रिकेट एक्सपर्ट देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. मोहसीन अली नावाच्या एका पाकिस्तानी क्रिकेट एक्सपर्टने लाईव्ह चर्चा सुरू असतानाच आपल्या पत्नीला मारहाण केली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून प्रेक्षकांनी मोहसीन अलीला चांगलेच धारेवर धरले.

मोहसीन अलीचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायर झाल्यानंतर प्रेक्षकांच्या कमेंट येऊ लागल्या. एका युजरने त्याला हा कौटुंबिक हिंसाचार असल्याचं म्हणत मोहसीन अलीवर टीका केली त्यावर उत्तर देताना मोहसीन म्हणाला की, 'लाईव्ह सुरू असताना तुम्हाला जर कोणी विचलित केलं तर अशी प्रतिक्रिया येऊ शकते. मला आश्चर्य वाटतंय की हा कसा काय कौटुंबिक हिंसाचार असू शकतो.'

माझ्या लग्नाला 31 वर्षे झाली आहेत. तुझं वय देखील तेवढं नसेल. मी पत्नीचा आदर करतो ती माझा आदर करते म्हणूनच आम्ही 31 वर्षे एकत्र आहोत. हा कौटुंबिक हिंसाचार नाही.' मोहसीन अली हा 'आप का मोहसीन अली' नावाचे यूट्यूब चालवतो. त्याचे 100k सबस्क्रायबर आहेत.

पाकिस्तान क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून खळबळ माजली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाचे संचालक मोहम्मद हाफीजला पदावरून हटवलं आहे. त्यानंतर आता पाकिस्तान संघाचे कर्णधारपद पुन्हा बाबर आझमकडे येण्याची दाट शक्यता आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार प्रत्येकी ३००० रुपये; निधी मागणीची फाईल वित्त विभागाकडे; बालसंगोपन योजनेसाठीही मिळणार १०० कोटी

पोलिस ठाण्यात जाऊनही न्याय मिळत नाही, चिंता नको, आता प्रत्येक शनिवारी भेटणार ‘एसपी’! सोलापूर पोलिसांचे ‘न्याय संवाद’ ॲप, ‘या’ क्रमांकावर करा तक्रार

HSC Hall Ticket 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! आजपासून बारावीचे हॉल तिकीट उपलब्ध; असे करा डाउनलोड

प्रचार उद्या थांबणार! मंगळवारी रात्रीपासून उमेदवारांच्या हालचालींवर राहणार नजर; रात्री १० नंतर सोलापूर शहरातील पक्ष कार्यालये, दुकाने राहणार बंद, वाचा...

e-SIM Fraud Awareness : ई-सिम कार्डच्या नावावर फसवणूक

SCROLL FOR NEXT