Pakistan squad T20 World Cup 2024 esakal
Cricket

Pakistan Cricket Team : पीसीबी प्रमुखांना संघ आवडलाच नाही! पाकिस्तानची संघ जाहीर करण्यास टाळाटाळ

T20 World Cup 2024 : शेवटची तारीख अवघ्या एक दिवसावर आली तरी पाकिस्तानचा टी 20 वर्ल्डकप संघ अजून जाहीर झाला नाही.

अनिरुद्ध संकपाळ

Pakistan squad T20 World Cup 2024 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी यांच्यामुळं पाकिस्तानचा टी 20 वर्ल्डकपसाठीचा संघ अजून जाहीर झालेला नाही. संघ जाहीर करण्यासाठी आता फक्त एक दिवस शिल्लक राहिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीसीबी चेअरमन नक्वी यांनी निवड प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी निवडसमिती सदस्यांची चांगलीच कानउघडणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाकिस्तान संघ जाहीर करण्यात का होतोय उशीर?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सचिव मोहसीन नक्वी हे संघ निवड प्रक्रियेत कायम आपलं मत व्यक्त करत आले आहेत. दरम्यान, संघ व्यवस्थापनाने इंग्लंडवरून नक्वी यांना टी 20 वर्ल्डकपसाठी पाकिस्तानच्या संभाव्य खेळाडूंची यादी पाठवली. या यादीवर नक्वी यांनी आक्षेप घेतला आहे.

सुरूवातीला पीसीबी चेअरमन नक्वी यांनी निवडसमिती सदस्यांमध्ये पुरेशी सल्लामसलत झाली नसल्याचे सांगितले. त्यांनी संपूर्ण सात निवडसमिती सदस्यांनी एकत्र बैठक आयोजित करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. त्यांनी फक्त कोच, कॅप्टन आणि निवडसमितीचे मत लक्षात घेऊन संघ जाहीर करण्यास विरोध केला आहे.

निवडसमितीमधील वहाब रियाझ आणि मोहम्मद युसूफ हे दोघेच संभाव्य संघ निवडत होते. त्यांनीच कर्णधार बाबर आझम आणि प्रशिक्षकांशी सल्लामसलत केली. नक्वी यांनी अब्दुल रझाक, असाद शफिक, पिलाल अफझल आणि डाटा अॅनलिस्ट हसन चीमा यांंना संघ निवडीच्या प्रक्रियेत सामावून घेतलं नसल्यांच निदर्शनास आणून दिलं. नक्वी यांचा कोणत्या खेळाडूला विरोध नाहीये. मात्र निवड समितीच्या कार्यपद्धतीवर त्यांनी ताशेरे ओढले आहेत.

(Pakistan Cricket Team)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India and Oman CEPA: भारत-ओमान करार लागू! होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर ही डील इतकी महत्त्वाची का? उद्योगांसाठी गेमचेंजर ठरणार

Mumbai News: 'वनराणी'ला पर्यटकांची पसंती! पाच महिन्यांत ३६ हजार जनाची सवारी, २९ लाख महसुलाची भर

MBA MMS CET Exam Result : एमबीए-एमएमएस सीईटीचा निकाल जाहीर; एकूण ८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण

Bhimashankar News : भाविकांसाठी आनंदाची बातमी! श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर सोमवारपासून होणार दर्शनासाठी खुले

Vidhan Parishad Election : महायुतीत ‘ऑल इज वेल’चा दावा; पण उमेदवारी अर्जावेळी दोन मंत्री, प्रमुख नेते अन् जिल्हाध्यक्ष अनुपस्थित, कारण काय?

SCROLL FOR NEXT