Yuvraj Singh, Harbhajan Singh, Suresh Raina Instagram
Cricket

Harbhajan Singh: युवराज, हरभजन, सुरेश रैना यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल! जाणून घ्या प्रकरण

Yuvraj Singh, Harbhajan Singh Reel: वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजंड्स स्पर्धा जिंकल्यानंतर हरभजन सिंगने सुरेश रैना आणि युवराज सिंग यांच्यासह एक रिल सोशल मीडियावर शेअर केलं होतं. मात्र ते रिल त्यांना चांगलंच महागाड पडल्याचे दिसून येत आहे.

Pranali Kodre

Police complaint against Harbhajan Singh, Yuvraj Singh: वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजंड्स स्पर्धेचे विजेतेपद इंडिया चॅम्पियन्स संघाने जिंकले. या स्पर्धेत इंडिया चॅम्पियन्सकडून हरभजन सिंग, सुरेश रैना, गुरकिरत मन आणि युवराज सिंग हे खेळाडू खेळले होते. या स्पर्धेत इंडिया चॅम्पियन्स संघाने विजेतेपद जिंकल्यानंतर हरभजन सिंगने एक रिल सोशल मीडियावर शेअर केले होते.

या रिलमध्ये हरभजनसह युवराज, रैना आणि गुरकिरत मन दिसले होते. त्यांनी हे रिल तौबा-तौबा या गाण्यावर बनवले होते, ज्यात ते अडखळत आणि पाठ धरून चालताना दिसतात. या स्पर्धेमुळे शरीरावर किती परिणाम झाला, हे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगितलं होतं.

मात्र या व्हिडिओबाबत सध्या टीका होत आहे. दिव्यांग हक्क कार्यकर्त्यांनी या व्हिडिओला क्रूर चेष्टा असल्याचे म्हटले आहे. नॅशनल प्लेटफॉर्म फॉर राइट्स ऑफ द डिसेबल्ड (एनपीआरडी) ने या व्हिडिओला पूर्णपणे अवमानास्पद असल्याचे म्हटले आहे.

एनपीआरडी अध्यक्ष अरमान अली यांनी भारतीय क्रिकेट मंडळाला याप्रकरणी स्वत:हून हस्तक्षेप करत संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याचे आवाहन केले. त्यांनी दिल्लीतील अमर कॉलनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

महत्त्वाचे म्हणजे मेटा इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि उपाध्यक्ष संध्या देवनाथन यांच्याविरुद्धही तक्रार दाखल करण्यात आली आहे. इंस्टाग्रामची मालकी मेटाकडे आहे. त्यामुळे अशा प्रकारचा कटेंट पोस्ट करण्याची परवानगी दिल्याने त्यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार पोलीस अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची तक्रार दाखल झाली असल्याची माहिती देताना आता याबाबत चौकशीसाठी ही तक्रार सायबर सेलकडे पाठवण्यात आल्याचे सांगितले.

दरम्यान, पीटीआयशी बोलताना अरमान अली यांनी सांगितले की केवळ माफी मागून काही होणार नाही, क्रिकेटपटूंवर अशा कृतीसाठी कारवाई झाली पाहिजे.

हरभजन सिंगची माफी

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रिलवर टीका झाल्याचे लक्षात येतात हरभजनने ते रिल इंस्टाग्रावरून डिलीट केले होते. तसेच त्याने सोशल मीडियावर या प्रकरणात माफीही मागितली आहे.

त्याने लिहिले, 'आम्ही प्रत्येक व्यक्तीचा आणि समुदायाचा आदर राखतो आणि १५ दिवस क्रिकेट खेळल्यानंतर आमच्या शरीराचे जे हाल झाले, त्यावर हा व्हिडिओ होता.'

'शरीरावर सूज आहे आहे... आम्ही कोणालाही दुखावण्याचा प्रयत्न करत नव्हतो. तरीही जर लोकांना असं वाटत असेल की आम्ही काही चुकीचं केलं, तर सर्वांची माफी मागतो. कृपया हे इथेच थांबवा आणि पुढे जा. आनंदी आणि निरोगी रहा, सर्वांना प्रेम.'

मानसी जोशीकडूनही टीका

भारताची पॅरा-बॅडमिंटनपटू मानसी जोशी हिने देखील हरभजन, रैना आणि युवराजवर कडाडून टीका केली होती. तिने म्हटले की त्यांच्याकडून जबाबदारीने वागणं अपेक्षित होतं. या रिलमुळे दिव्यांग व्यक्तींचा अपमान होत आहे. हा काही विनोद नाही. यामुळे लोक दिव्यांग व्यक्तींची अधिक चेष्टा करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT