INDW vs RSAW  ESAKAL
Cricket

INDW vs RSAW : शेवटच्या षटकात पूजा वस्त्रकारचा चमत्कार; भारताचा 4 धावांनी विजय अन् मालिका खिशात

INDW vs RSAW ODI Series : भारताच्या विजयात स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौरच्या शतकी खेळींचा देखील मोलाचा वाटा होता.

अनिरुद्ध संकपाळ

INDW vs RSAW : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने 4 धावांनी रोमहर्षक विजय मिळवत तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात टाकली.

भारताने प्रथम फलंदाजी करताना स्मृती मानधनाच्या 136 आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या 103 धावांची शतकी खेळीच्या जोरावर 50 षटकात 325 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने कडवा प्रतिकार करत 321 धावांपर्यत मजल मारली. शेवटच्या षटकात आफ्रिकेला 11 धावांची गरज असताना पूजा वस्त्रकारने दमदार मारा करत फक्त 6 धावा देत 2 विकेट्स घेतल्या अन् भारताला विजय मिळवून दिला.

भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 326 धावांचे आव्हान ठेवले होते. त्याच्या प्रत्युत्तरात खेळताना दक्षिण आफ्रिकेची सुरूवात काही चांगली झाली नाही. ताझमिन ब्रिट्स अवघ्या 5 धावा करून बाद झाली. तिला अरूंधतीने बाद केले. त्यानंतर आलेली एनिके बॉश ही 18 धावांची भर घालून माघारी परतली. दरम्यान, शतकवीर स्मृती मानधनाने लुसला 12 धावांवर बाद करत आफ्रिकेची अवस्था 3 बाद 67 धावा अशी केली होती.

मात्र एक बाजू लावून धरलेल्या सलामीवीर लॉरा वुलवॉर्डने मारिझाने कापसोबत भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघींनी आफ्रिकेला 250 धावांचा टप्पा पार करून दिला. मारिझानेने 94 चेंडूत 114 धावांची शतकी खेळी केली. अखेर दिप्ती शर्माने तिची विकेट घेत भारताला मोठा दिलासा दिला.

मात्र सलामीवीर लॉरा अजून क्रीजवर होती. तिने नादीने सोबत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. शेवटच्या षटकात आफ्रिकेला विजयासाठी फक्त 11 धावांची गरज होती. मात्र पूजा वस्त्रकारने फक्त 6 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. भारताने सामना 4 धावांनी जिंकून मालिकेत 2 - 0 अशी विजयी आघाडी घेतली. आफ्रिकेची सलामीवीर लॉराची शतकी खेळी वाया गेली. तिने 135 चेंडूत 135 धावा केल्या. या खेळीत तिने 12 चौकार आणि 3 षटकार मारले.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson साठी राजस्थान रॉयल्सने सुरू केली दुसऱ्या संघाची शोधाशोध; CSK संघ शर्यतीतून बाहेर?

Bihar SIR: बिहारची एसआयआर मोहीम मतदारांप्रती अनुकूल; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

Pune Metro Update: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! १५ ऑगस्टपासून मेट्रो गर्दीच्या वेळी दर सहा मिनिटांनी धावणार

Latest Marathi News Updates Live: भास्कर जाधवांनी पुन्हा ब्राह्मणांना डिवचलं!

2500 Dogs Killed and Buried: ‘’मी तेव्हा २५०० कुत्रे मारून झाडांखाली पुरले होते'’ आमदाराचं थेट विधिमंडळातच विधान!

SCROLL FOR NEXT