Preity Zinta | St Lucia Kings won CPL 2024 
Cricket

CPL 2024: प्रीती झिंटाच्या संघाची विजेतेपदाची प्रतीक्षा संपली, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात ठरले चॅम्पियन

St Lucia Kings won Caribbean Premier League 2024: प्रीती झिंटाची सहमालकी असलेल्या संघाने कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहेत. हे या संघाचे पहिलेच विजेतेपद आहे.

Pranali Kodre

St Lucia Kings won CPL 2024: रविवारी (६ ऑक्टोबर) कॅरेबियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना प्रोव्हिडन्स येथे गयाना ऍमेझॉन वॉरियर्स विरुद्ध सेंट लुसिया किंग्स संघात पार पडला. या सामन्यात सेंट लुसियाने ६ विकेट्सने विजय मिळवत पहिल्यांदाच सीपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.

या संघाची सहमालकी प्रीती झिंटा, नेस वाडिया यांच्याकडे असून आयपीएलमधील पंजाब किंग्स संघाची ही सिस्टर फ्रँचायझी आहे.

दरम्यान, सेंट लुसिया किंग्सने हे विजेतेपद मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमीच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखी पहिल्यांदाच सीपीएलचे विजेतेपद मिळवले.

अंतिम सामन्यात सेंट लुसियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ऍमेझॉन वॉरियर्स संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. ऍमेझॉन वॉरियर्स प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १३८ धावाच केल्या.

त्यांच्याकडून ड्वेन प्रीटोरियसने सर्वाधिक २५ धावा केल्या. तसेच शाय होपने २२ धावांची खेळी केली. बाकी कोणालाही २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.

सेंट लुसियाकडून नूर अहमदने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच खॅरी पिएर, मॅथ्यु फोर्डे, अल्झारी जोसेफ, रोस्टन चेस आणि डेविड विसे यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या सेंट लुसियासमोर १३९ धावांचे आव्हान होते. हे आव्हान सेंट लुसियाने १८.१ षटकात ४ विकेट्स गमावत पूर्ण केले. त्यांच्याकडून रोस्टन चेस आणि ऍरॉन जोन्स यांनी आक्रमक खेळत ८८ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

रोस्टन चेस २२ चेंडूत ३९ धावांवर नाबाद राहिला. जोन्सने ३१ चेंडूत ४८ धावांची नाबाद खेळी केली. याबरोबरच कर्णधार फाफ डू प्लेसिसने २१ धावांची खेळी केली.

ऍमेझॉन वॉरियर्सकडून रोमारियो शेफर्ड, केविन सिन्केअर, मोईन अली आणि ड्वेन प्रीटोरियस यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT