Punjab Kings new coach sakal
Cricket

IPL 2025 : प्रिती झिंटाला Punjab Kings साठी हवा भारतीय प्रशिक्षक; राहुल द्रविडसाठी वाढतेय का रस्सीखेच?

IPL 2025 Punjab Kings Coach - रिकी पाँटिंगनंतर, आणखी एक प्रशिक्षक इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील पर्वात फ्रँचायझीची साथ सोडू शकतो.

Swadesh Ghanekar

IPL 2025, Punjab Kings Rahul Dravid preity zinta - इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या तयारीसाठी सर्वच फ्रँचायाझींनी कंबर कसली आहे. येत्या ३० किंवा ३१ जुलैला सर्व फ्रँचायझींसोबत बीसीसीआय महत्त्वाची बैठक घेणार आहे. त्या बैठकीत IPL 2025 Mega Auction साठी किती खेळाडूंना प्रत्येकी फ्रँचायझी रिटेन करू शकतात, राईट टू मार्क नियम आदी काही मुद्यांवर चर्चा अपेक्षित आहे. पण, त्याआधी फ्रँचायझींनी त्यांच्या प्रशिक्षकांमध्ये बदल करण्यास सुरूवात केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने रिकी पाँटिंगसोबत असलेला करार संपुष्टात आणला आहे. राजस्थान रॉयल्स ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेता प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) याच्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यात आता पंजाब किंग्सनेही भारतीय प्रशिक्षक हवा, असा हट्ट धरला आहे.

पंजाब किंग्ज फ्रँचायझीचे मुख्य प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस ( Trevor Bayliss) यांच्यासोबतचा करार संपुष्टात आणण्याचा निर्णय जवळपास घेतला आहे. पंजाब किंग्जसोबतचा त्यांचा २ वर्षांचा करार संपला असून फ्रँचायझी त्याचे नूतनीकरण करण्याची शक्यता नाही. क्रिकबजला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, PBKS संघाला मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय प्रशिक्षकाच्या शोधात आहे. अनेक पर्यायांवर विचार करत आहेत. ते शेवटी भारतीय प्रशिक्षक निवडतील की नाही हे पाहावे लागेल. संभाव्य उमेदवारांमध्ये संजय बांगर आहे. ज्याने पूर्वी फ्रँचायझीच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली होती आणि तो सध्या क्रिकेट विकास संचालक आहे.

२२ जुलै रोजी संचालक मंडळाची बैठकीत हा निर्णय होणार होता, परंतु ती बैठकच झाली नाही. या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या मेगा-लिलावापूर्वी फ्रँचायझीने नवीन प्रशिक्षकासाठी शोध आतापासूनच सुरू केला आहे. भारतीय संघासह राहुल द्रविडची उल्लेखनीय कामगिरी, गौतम गंभीर-चंद्रकांत पंडित जोडीने कोलकाता नाईट रायडर्सच्या गेल्या मोसमातील विजेतेपदाच्या मोहिमेत दिलेले योगदान आणि आशिष नेहराचा गुजरात टायटन्ससोबतचा यशस्वी सहभाग यामुळे भारतीय प्रशिक्षकांची डिमांड वाढली आहे.

सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग स्टाफमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आगामी हंगामासाठी त्यांच्या कोचिंग टीममध्ये दिनेश कार्तिकचा समावेश केला आहे. बेलिस यांच्या कोचिंग शैलीबद्दल कोणतीही तक्रार नाही, परंतु त्यांना पंजाब किंग्ससाठी अपेक्षित निकाल नोंदवता आलेले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT