India vs England 5th Test Marathi News sakal
Cricket

Ind vs Eng : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत अश्विन करणार टीम इंडियाचे नेतृत्व, दिग्गज खेळाडू काय म्हणाला?

India vs England 5th Test News : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे.

Kiran Mahanavar

India vs England 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. सध्या रांचीमध्ये दोन्ही संघांमध्ये मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळला जात आहे, ज्यामध्ये टीम इंडियाला विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य मिळाले होते, याला प्रत्युत्तर म्हणून टीम इंडियाने विकेट न गमावता 40 धावा केल्या आहेत.

या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना धर्मशाला येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचे माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने धर्मशाला कसोटीत टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवायला हवे, हा त्याचा 100 वा कसोटी सामना असेल, असे गावसकर यांचे मत आहे. अश्विन सध्या रांचीमध्ये 99 वा कसोटी सामना खेळत आहे.

आर अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात एक तर दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये संयुक्तपणे सर्वाधिक 5 बळी घेणारा तो भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी अनिल कुंबळेने 35 वेळा कसोटीत 5 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने श्रीलंकेच्या रंगना हेराथला मागे टाकले आहे. हेराथने कसोटी क्रिकेटमध्ये 34 वेळा 5 विकेट घेतल्या आहेत.

चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस जियो सिनेमावर अश्विनशी बोलताना सुनील गावसकर म्हणाले, 'उद्या (सोमवार) भारत जिंकेल आणि त्यानंतर संघ पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी धर्मशालाला जाईल. मला विश्वास आहे की रोहित तुम्हाला मैदानावर संघाचे नेतृत्व करण्याची संधी देईल. भारतीय क्रिकेटसाठी तुम्ही काय केले आहे याचा विचार करता हा एक अद्भुत सन्मान असेल.

यानंतर अश्विन म्हणाला की, सनी भाई, यासाठी मी तुमचा आभारी आहे. पण मला वाटते की मी आता या सर्व गोष्टींच्या पलीकडे गेलो आहे. मी या संघासोबत घालवलेल्या वेळेचा आनंद घेत आहे. ते जितके जास्त काळ टिकेल तितके तुम्ही आनंदी व्हाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT