R Ashwin Marathi News
R Ashwin Marathi News sakal
क्रिकेट

Ind vs Eng : अश्विनचा 100 व्या कसोटीत तांडव, ब्रिटिशांचे मोडले कंबरडे अन्...

Kiran Mahanavar

India vs England 5th Test Dharamsala Ravichandran Ashwin : धरमशाला येथे रविचंद्रन अश्विन कारकिर्दीतील 100 वी कसोटी खेळत आहे. या सामन्यात इंग्लंडच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना अश्विनने आपला पंजा उघडला. त्याने इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज बेन फॉक्सला बाद करून पाचवी विकेट घेतली. पहिल्या डावात त्याने 4 विकेट घेतल्या होत्या, जिथे तो पंजा उघडण्यास चुकला. मात्र यावेळी अश्विनने आपला पंजा उघडून इंग्रजांचे कंबरडे मोडले आहे.

अश्विनसमोर इंग्लिश फलंदाज हातबल दिसत होते. अश्विन या मालिकेत सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहे. अश्विनने प्रत्येक सामन्यात विकेट घेतल्या आहेत. आता मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. या मालिकेत भारतीय फिरकीपटूने 500 कसोटी बळींचा आकडा गाठला.

हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत त्याने दोन्ही डावात तीन-तीन विकेट्स घेतल्या आहेत. यानंतर त्याने विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावात 0 आणि 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत त्याने 1-1 विकेट घेतली. यानंतर रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीत त्याने 1 आणि 5 विकेट घेतल्या. आता तो धरमशाला कसोटीत चमत्कार करताना दिसत आहे.

अश्विनची कसोटी कारकीर्द!

नोव्हेंबर 2011 मध्ये दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण करणारा अश्विन त्याची 100 वी कसोटी खेळत आहे. या सामन्यांच्या 186 डावांमध्ये त्याने 516 विकेट घेतल्या आहेत. आतापर्यंत त्याचा सामन्यातील सर्वोत्तम आकडा 13/140 आहे.

याशिवाय त्याने फलंदाजीतही अद्भुत कामगिरी केली आहे. या कालावधीत त्याने 141 डावात फलंदाजी करताना 26.26 च्या सरासरीने 3309 धावा केल्या आहेत. त्याने 5 शतके आणि 14 अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 124 धावा होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT