Rahul Dravid Meet PM Narendra Modi  esakal
Cricket

Rahul Dravid : ती वेळ चांगली नव्हती.... पंतप्रधान मोंदीना भेटीवेळी द्रविड वनडे वर्ल्डकप फायनलबद्दल काय म्हणाला?

PM Modi Meet Rahul Dravid : राहुल द्रविडने वनडे वर्ल्डकप 2023 च्या फायनलवेळी ड्रेसिंग रूममध्ये मोदींच्या भेटीचा देखील उल्लेख केला.

अनिरुद्ध संकपाळ

PM Narendra Modi Meet Team India Rahul Dravid : भारताच्या टी 20 वर्ल्डकप विजेती टीम 4 जुलैला संध्याकाळी मुंबईत दाखल झाली. त्यापूर्वी भारतीय संघाने दिल्लीत लँड होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्याचा व्हिडिओ आता शेअर करण्यात आला आहे. यावेळी मोदींनी संघातील प्रत्येक खेळाडूसोबत संवाद साधला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल द्रविड यांचे देखील संभाषण झालं. यावेळी राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींचे या भेटीसाठी आभार मानले. तसेच 2023 च्या वनडे वर्ल्डकप फायनलवेळी मोदी आणि अमित शहा यांनी टीम इंडियाची ड्रेसिंग रूममध्ये जाऊन भेट घेतली होती. याबद्दल देखील राहुल द्रविडने वक्तव्य केलं.

राहुल द्रविड पंतप्रधानांशी बोलताना म्हणाला की, 'तुम्हाला भेटण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल तुमचे आभार. अहमदाबादच्या सामन्यावेळी देखील तुम्ही आम्हाला भेटण्यासाठी आला होता. मात्र ती वेळ योग्य नव्हती या मताशी मी सहमत आहे. त्यामुळं आज आपण या आनंदाच्या क्षणी भेटतोय याचा मला खूप आनंद आहे.'

'मी यावेळी इतकं सागू इच्छितो की रोहित शर्मा आणि संघातील सर्व खेळाडूंनी दाखवलेला झुंजारपणा अन् हार न मानण्याची वृत्ती खूप महत्वाची होती. या यशाचं सर्व श्रेय हे या खेळाडूंनाच जाते. त्यांनी यासाठी खूप कष्ट केले आहेत. या खेळाडूंनी युवा पिढीला प्रेरित केलं आहे. ही खूप आनंदाची बाब आहे.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंच्या भेटीवेळी प्रत्येक खेळाडूशी संवाद साधला. हार्दिक पांड्याला शेवटचं षटक टाकताना कशी भावना होती. सूर्यकुमार यादवला देखील क्लासेनच्या कॅचबद्दल मोदींनी प्रश्न विचारला. यावेळी मोदींनी अनेक खेळाडूंसोबत हास्यविनोद देखील केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT