Cricket

Rahul Dravid BCCI Incentive : हा प्रोत्साहन भत्ता नाही तर... राहुल द्रविडची बीसीसीआयच्या स्किमवर पहिली प्रतिक्रिया

अनिरुद्ध संकपाळ

Rahul Dravid Statement On BCCI Test Cricket Incentive Scheme : भारतीय संघातील श्रेयस अय्यर आणि इशान किशन सारख्या स्टार खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता. त्यांना याची किंमत मोजावी लागली. बीसीसीआयने त्यांना केंद्रीय करारातून बाहेरचा रस्ता दाखवला.

याचबरोबर बीसीसीआयने आता कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून एक नवीन स्कीम सुरू केली आहे. भारताने इंग्लंडविरूद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकल्यानंतर बीबीसीआय सचिव जय शहा यांनी ही स्कीम जाहीर केली.

या स्कीमबाबत प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी बीसीसीआयच्या कसोटी क्रिकेटला महत्व देण्याच्या या स्कीमचे कौतुक केले आहे.

बीसीसीआय सचिव जय शहा यांनी आज जे खेळाडू भारताकडून कसोटी क्रिकेट खेळतील त्यांना हंगामात खेळलेल्या कसोटी सामन्यांच्या अनुषंगाने पगार आणि मॅच फी व्यतिरिक्त प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

यावर प्रशिक्षक राहुल द्रविडने देखील आपले मत व्यक्त केले. इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिका विजयानंतर राहुल द्रविड म्हणाला, 'मला आशा आहे की कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी पैसा हा प्रोत्साहन म्हणून देण्यात येत नाहीये. कसोट क्रिकेट किती अवघड आणि कठिण फॉरमॅट आहे याला मान्यता देणारं एक पाऊल आहे.'

'कसोटी क्रिकेट खेळणं इतकं सोपं नाही. आपण 100 कसोटी सामने खेळल्यानंतर ज्या प्रकारे सेलिब्रेशन करतो त्या प्रकारे 100 टी 20 सामने खेळल्यावर करतो का? हा काही प्रोत्साहन भत्ता नाही तर हे बक्षीस आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT