Cricket sakal
Cricket

Ind vs Eng : राजकोट खेळपट्टीबाबत सावध पवित्रा ; भारतीय संघाची मदार पुन्हा जसप्रीत बुमरा आणि त्याच्या रिव्हर्स स्विंगवर?

फलंदाजीस उपयुक्त असा लौकिक असलेल्या राजकोटच्या मैदानावर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या भारत-इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी खेळपट्टी कशी असेल, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

सकाळ वृत्तसेवा

राजकोट : फलंदाजीस उपयुक्त असा लौकिक असलेल्या राजकोटच्या मैदानावर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या भारत-इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी खेळपट्टी कशी असेल, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कुलदीप यादवच्या मते ती पारंपरिक असेल, पण त्याला अंतिम संघात स्थान मिळेल याची खात्री नाही. एकूणच परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय संघ खेळपट्टीबाबत सावध आहे.

या सामन्यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलण्यासाठी कुलदीप यादवला संघ व्यवस्थापनाने पाठवले. रवींद्र जडेजा तंदुरुस्त होऊन या सामन्यात खेळणार हे जवळपास निश्चित असल्यामुळे कदाचित कुलदीप यादवला जागा रिकामी करावी लागेल. भारतीय संघाकडून अश्विन, जडेजा आणि अक्षर पटेल यांना प्राधान्य असेल. ही मालिका १-१ अशा बरोबरीत असल्यामुळे आणि इंग्लंडकडून ‘बॅझबॉल’च्या मानसिकतेतून खेळ केला जात असल्यामुळे खेळपट्टीचे महत्त्व वाढले आहे. पहिल्या दोन्ही कसोटीत फिरकी गोलंदाजांना बऱ्यापैकी साथ मिळाली, परंतु विशाखापट्टण येथील सामन्यात बुमराच्या वेगवान माऱ्याने सामन्याला कलाटणी दिली होती. त्यामुळे राजकोटचीही खेळपट्टी स्पोर्टिंग असेल असे बोलले जात आहे; मात्र आज आणि उद्या तिच्यावर कसे प्रयोग केले जातात हे महत्त्वाचे आहे. या खेळपट्टीबाबत माहीत नाही, पण पुढे सामन्यातील खेळपट्ट्या आखाडा नसतील असेही नाही, असे मत कुलदीपने व्यक्त केले.

रिव्हर्स स्विंगचे अस्त्र

कुलदीपने पत्रकार परिषदेत बोलताना सांगितल्याप्रमाणे ही खेळपट्टी आखाडा नसेल. त्यामुळे पहिले दोन दिवस फलंदाज वर्चस्व गाजवू शकतील. पुढच्या तीन दिवसांत फिरकी गोलंदाजांना संधी असेल; मात्र चेंडू जुना होत जाईल आणि त्याच्या एका बाजूची लकाकी कायम ठेवली तर रिव्हर्स स्विंग सर्वांत महत्त्वाचे अस्त्र ठरू शकेल.

भारताचे होते वर्चस्व

सौराष्ट्र संघटनेच्या या मैदानावर २०१६ आणि २०१९ या वर्षी दोन कसोटी सामने झाले होते. २०१६ मधील भारत-इंग्लंड सामना अनिर्णित राहिला होता; तर २०१९ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध विजय मिळवताना भारताने पहिल्या डावात ९ बाद ६४९ धावांचा डोंगर उभा केला होता.

राजकोटचा इतिहास

सौराष्ट्र क्रिकेट संघटनेचे हे स्टेडियम चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जडेजा यांचे होम ग्राऊंड आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये या दोघांनी येथे त्रिशतके केलेली आहेत. प्रथम श्रेणी सामन्यातील २० डावांत ५०० हून अधिक धावा फटकावण्यात आलेल्या आहेत; तर २० डाव १५० किंवा त्याहून कमी धावांत संपुष्टात आलेले आहे. त्यामुळे सामन्यातील अखेरच्या दोनतीन दिवसांत फिरकीचे वर्चस्व राहू शकेल.

म्हणून धोका स्वीकारणार नाही

विराट कोहली आणि के एल राहुल हे अनुभवी फलंदाज मधल्या फळीत असते तर बेधडकपणे पहिल्या दिवसापासून फिरकीस साथ देणारी खेळपट्टी तयार करण्यात आली असती, परंतु आता मधल्या फळीत एकदमच नवखे फलंदाज असल्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन धोका स्वीकारणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT