Rohit Sharma
Rohit Sharma  Esakal
क्रिकेट

Ranji Trophy 2024 Rohit Sharma : मुंबईचा योद्धा... मुंबईने रणजी ट्रॉफी जिंकताच रोहितची खास पोस्ट

अनिरुद्ध संकपाळ

Ranji Trophy 2024 Rohit Sharma : मुंबईने विदर्भचा 169 धावांनी पराभव करत आपले 42 वे विजेतेपद पटकावले. हा सामना मुंबईचा वरिष्ठ खेळाडू धवल कुलकर्णीसाठी खास होता. कारण त्याचा हा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील शेवटचा सामना होता. त्याने निवृत्ती जाहीर केली होती. धवल कुलकर्णीची निवृत्ती रणजी विजेतेपदाने झाली.

दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्माने देखील मुंबईच्या विजयानंतर धवल कुलकर्णीसाठी खास इन्स्टाग्राम स्टोरी ठेवली. त्याने धवल कुलकर्णीला मुंबईचा योद्धा असं संबोधलं. धवल कुलकर्णीने प्रथम श्रेणी कारकिर्दीत 95 सामन्यात 281 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 2008 मध्ये आपली कारकीर्द सुरू केली होती.

मुंबईकडून खेळणाऱ्या धवल कुलकर्णीने आतापर्यंत 15 वेळा 5 विकेट्स तर एकवेळा 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

मुंबईने विदर्भरचा 169 धावांनी पराभव केल्यानंतर रोहित शर्माने धवल कुलकर्णीसाठी खास स्टोरी ठेवली. धवल कुलकर्णी हा मुंबई इंडियन्सकडून देखील खेळला आहे. रोहित म्हणाला की, 'मुंबईचा योद्धा! खूप छान, दमदार कारकीर्द!'

रोहित आणि धवल कुलकर्णी हे मुंबईच्या संघात एकाचवेळी आपले स्थान पक्के करत होते. ते मुबंई इंडियन्सच्या संघात देखील एकत्रच खेळले होते. ज्यावेळी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कॅप्टन्सी काढून घेतली त्यावेळी धवलने क्रिप्टिक पोस्ट केली होती.

रणजी ट्रॉफी 2023-24 च्या फायनलमध्ये विदर्भविरूद्ध धवलने सामन्यात 4 विकेट्स घेतल्या. त्याने पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 1 विकेट घेतली.

सामन्यानंतर धवल कुलकर्णी भावूक झाल्याचे दिसले. त्याने अजिंक्य रहाणेचे आभार मानले. कारण रहणेने धवल कुलकर्णीला सामना संपवण्याची संधी दिली होती.

धवल म्हणाला की, 'एका उच्च पातळीवर सुरूवात आणि शेवट करावा असे क्रिकेटपटूचे स्वप्न असते. ही माझी सहावी फायनल आहे. त्यातील 5 वेळा आम्ही विजेतेपद पटकावलं हे विजेतेपद माझ्या खूप जवळचं आहे.'

अजिंक्य रहाणेने खूप चांगली गोष्ट केली. रहाणे मला गोलंदाजीला पाचारण करणे याची मी अपेक्षा केली नव्हती. तुषारने गेल्या दोन षटकात दोन विकेट्स घेतल्या होत्या तरी त्याने माझ्याकडे चेंडू सोपवला त्याबद्दल त्याचे आभार.

तो म्हणाला की, तू आपल्या गोलंदाजीच्या विभागाचे अनेक वर्षे नेतृत्व केलं आहेत. आता या षटकात देखील तू आमचं नेतृत्व कर.'

धवल कुलकर्णी हा भारतीय संघाकडून देखील खेळला आहे. त्याने 12 वनडे आणि 2 टी 20 सामने खेळले आहेत. त्याने वनडेत 19 तर टी 20 मध्ये 3 विकेट्स घेतल्या.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT