Ranji Trophy  esakal
Cricket

Ranji Trophy 2024 Winner : रणजी जिंकणाऱ्या मुंबईवर कोट्यवधी रूपयांचा वर्षाव; विदर्भला देखील मिळार 'इतके' कोटी रूपये

Ranji Trophy 2024 Winner Prize Money : रणजी ट्रॉफी विजेत्या संघावर लक्ष्मी प्रसन्न होणार आहेच. याबरोबर उपविजेत्या संघाला देखील कोटीच्या घरात बक्षीस रक्कम मिळणार आहे. बीसीसीआयने नुकतेच बक्षीस रक्कमेत वाढ केली होती.

अनिरुद्ध संकपाळ

Ranji Trophy 2024 Final Prize Money : मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर रणजी ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना झाला. या सामन्यात विदर्भ आणि मुंबई विजेतेपदासाठी भिडले. होम ग्राऊंडवर खेळणाऱ्या मुंबईने विदर्भचा 169 धावांनी पराभव केला. मुंबईने तब्बल 42 व्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव करोलं.

मुंबईने रणजी ट्रॉफी जिंकल्यानंतर त्यांच्यावर बीसीसीआयकडून त्यांना कोट्यावधी रूपयांचे बक्षीस मिळणार आहे. बीसीसीआयकडून उपविजेत्या विदर्भच्या संघाला देखील मोठी रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे.

रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्यांना किती मिळातात पैसे?

गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्येच बीसीसीआयने डोमेस्ट्रिक क्रिकेटमधील सर्व स्पर्धांची बक्षीस रक्कम ही वाढवली होती. यापूर्वी रणजी ट्रॉफी विजेत्या संघाला 2 कोटी रूपये तर उपविजेत्यांना 1 कोटी रूपये मिळत होते. आता यात बदल करण्यात आला असून बक्षीस रक्कमेत भरघोस वाढ केली आहे.

बीसीसीआयच्या नव्या बक्षीस रक्कमेनुसार आता रणजी ट्रॉफी विजेत्या संघाला 5 कोटी रूपये मिळणार आहेत. तर उपविजेत्या संघाला 3 कोटी रूपये मिळणार आहे.म

रणजी ट्रॉफी फायनल सामन्याबद्दल बोलायचं झालं तर प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात जरी मुंबईच्या कसलेल्या फलंदाजीला फारशी चमक दाखवता आली नसली तरी गोलंदाजीत मात्र त्यांनी धडाकेबाज कामगिरी केली.

मुंबईच्या गोलंदाजांनी विदर्भचा पहिला डाव 105 धावात संपवला होता. पहिल्या डावात 119 धावांची मोठी आघाडी घेतल्यानंतर मुंबईने दुसऱ्या डावात 418 धावांचा डोंगर उभरला. मुशीर खानने 136, श्रेयस अय्यरने 95 आणि अजिंक्य रहाणेने 73 धावांचे योगदान दिलं.

यानंतर विजयासाठी 537 धावांचे मोठे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या विदर्भने देखील घरच्या मैदानावर खेळणाऱ्या मुंबईला चांगलीच टक्कर देण्याचा प्रयत्न केला. अक्षय वाडकरच्या 102 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर आणि करूण नायरच्या 74 धावांच्या योगदानामुळे विदर्भने 368 धावांपर्यंत मजल मारली.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: म्हाडाचे भाडेतत्त्वावरील घरे धोरण मसुदा तयार

SCROLL FOR NEXT