Ranji Trophy Final 2024 Musheer Khan Century Marathi News 
Cricket

Musheer Khan: बड़े मियां तो बड़े मियां छोटे मियां... रणजी फायनलमध्ये मुशीर खानचे शतक; मोडला सचिनचा 29 वर्ष जुना विक्रम

Ranji Trophy Final 2024 : सर्फराज खानचा धाकटा भाऊ मुशीर खान याने रणजी ट्रॉफी 2024 च्या अंतिम सामन्यात शानदार शतक झळकावले. विदर्भाविरुद्धच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळात मुशीर खानने शतक झळकावून महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा २९ वर्ष जुना विक्रम मोडला आहे.

Kiran Mahanavar

Ranji Trophy Final 2024 Musheer Khan Century : सर्फराज खानचा धाकटा भाऊ मुशीर खान याने रणजी ट्रॉफी 2024 च्या अंतिम सामन्यात शानदार शतक झळकावले. विदर्भाविरुद्धच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळात मुशीर खानने शतक झळकावून महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा २९ वर्ष जुना विक्रम मोडला आहे.

मोठा भाऊ सर्फराज खान यांच्या पावलावर पाऊल ठेवत धाकटा भाऊ मुशीरनेही आपल्या नावाचा डंका गाजवत आहे. वयाच्या 19 व्या वर्षी रणजी ट्रॉफी फायनलमध्ये झंझावाती शतक झळकावून त्याने संपूर्ण क्रिकेट विश्वाला आपली क्षमता दाखवून दिली.

खरंतर, रणजी ट्रॉफी फायनलमध्ये मुंबईचा सामना विदर्भ संघाशी आहे, ज्यामध्ये मंगळवारी मुंबई संघाचा युवा खेळाडू मुशीर खानने तुफानी शतक झळकावून इतिहास रचला. 255 चेंडूंचा सामना करत मुशीरने शतक झळकावले आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

सर्फराजचा भाऊ मुशीर खान याने वयाच्या 19 वर्षे 14 दिवसांत रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये शतक झळकावले, तर सचिनने 21 वर्षे 10 महिन्यांत ही कामगिरी केली होती. त्यावेळी सचिनने 1994-94 च्या रणजी मोसमात पंजाबविरुद्ध द्विशतक झळकावले होते.

रणजी ट्रॉफी 2024 च्या अंतिम सामन्यात विदर्भाविरुद्ध मुंबई संघाने पकड मजबूत केली आहे. पहिल्या डावाच्या जोरावर मुंबईने 119 धावांची आघाडी घेतली होती आणि त्यानंतर दुसऱ्या डावातही मुंबई संघाचे फलंदाज चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत.

खराब सुरुवातीनंतर मुशीर खान आणि कर्णधार अजिंक्यने संघाच्या डावाची धुरा सांभाळली. कर्णधार रहाणे 73 धावा करून बाद झाला. त्याचवेळी श्रेयस अय्यर 111 चेंडूंचा सामना करत 95 धावा करून बाद झाला. वृत्त लिहिपर्यंत मुशीर खान सध्या 129 धावांवर फलंदाजी करत आहे. मुंबईकडे 451 धावांची आघाडी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT